मुंबईतील मालाड सायबर सेलने एका अशा माथेफिरू रोमिओला अटक केली जो त्याच्या शेजारी राहणाऱ्या एका तरूणीला पुन्हा पुन्हा सेक्स टॉप पाठवून त्रास देत होता. पोलिसांनुसार, आरोपी तरूणीला पसंत करत होता. पण तरूणीने त्याचा प्रस्ताव नाकारला होता. आरोपी तरूण याच गोष्टीने नाराज झाला झाला आणि तरूणीला सेक्स टॉय पाठवू लागला. इतकंच नाही तर त्याने पीडितेचा मोबाइल नंबरही एका पॉर्न साइटवर शेअर केला होता. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
'आजतक डॉट इन'ने दिलेल्या वृत्तानुसार, २६ वर्षीय कुणाल अंगोलकर असं आरोपीचं नाव आहे. तरूणीच्या तक्रावरून मालाड पोलिसांनी तरूणीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. सायबर सेलचे एपीआय विवेक तांबे आणि अशोक कोंडेसोबत पीएसआय वकोस यांनी प्रकरणाची चौकशी करत कुरिअर कंपनीकडून पार्सल पाठवणाऱ्याची माहिती काढण्याचा प्रयत्न केला. पण आरोपी पार्सलवर त्याचं नाव टाकत नव्हता. (हे पण वाचा : तीनवेळा लग्न केलं, तिसऱ्यांदा संसार मोडला; माहेरी आली अन् खुर्चीवर बसलेल्या वडीलांची हत्या केली)
पोलिसांनी प्रकरणाची चौकशी करत वीपीएनची माहिती काढली. ज्याद्वारे आरोपी प्रत्येकवेळी आयपी अॅड्रेस बदलून पार्सल डिलीव्हरी करत होता. मालाड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस धनंजय लिगाडे यांनी सांगितलं की, पीडित तरूणी २१ वर्षीय विद्यार्थिनी आहे. ती आरोपीच्या शेजारी राहते. आरोपी कुणालकडे तिचा मोबाइल नंबर होता. कुणालने आधी तिला प्रपोज करण्याचा प्रयत्न केला होता. पण तिने त्यांच प्रपोजल नाकारलं होतं.
त्यानंतर कुणालने तरूणीचा मोबाइल नंबर एका पॉर्न साइटवर टाकला होता. ज्यामुळे तिला वेगवेगळ्या नंबर्सवरून फोन येत होते. त्यासोबतच कुणालने पीडितेचा नंबर सेक्स टॉय विकणाऱ्या कंपनीला देऊन सेक्स टॉयची कॅश ऑन डिलीव्हरी करत होता. त्यानंतर तरूणीने पोलिसात तक्रार दिली होती.
पोलिसांनी सांगितलं की, सायबर सेलने आरोपीला पकडण्यासाठी आधी साधारण ५०० पेक्षा जास्त लोकांकडून वापरल्या जाणाऱ्या नेटवर्कवर लक्ष ठेवलं. त्यानंतर पोलिसांच्या हाती माथेफिरू रोमिओ कुणालच्या मोबाइलच्या नेटवर्कची माहिती मिळाली. मोठ्या मेहनतीनंतर सायबर एक्सपर्ट विवेक तांबेने आरोपीला अटक केली.