शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Mumbai Crime: उबरच्या ड्रायव्हरचा दादर ते पुणे प्रवास ठरला शेवटचा; गाडी गॅरेजमध्ये तर मृतदेह सापडला टोलनाक्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 15:38 IST

Mankhurd Murder Case: मुंबईतल्या तरुणाची हत्या करुन मृतदेह पुण्याजवळ फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Mumbai Crime:मुंबईतील उबर कॅब ड्रायव्हरच्या 'मिसिंग मिस्ट्री'चा उलगडा करण्यात मुंबई पोलिसांना अखेर यश आलं. मानखूर्द पोलिसांनी दोन दिवसांच्या कसून तपासानंतर बेपत्ता उबर चालकाच्या प्रकरणाचा तपास लावला. पोलिसांना तपासादरम्यान, उबर चालकाची हत्या झाल्याचे कळलं. त्यानंतर पोलिसांनी हत्या करणाऱ्या आरोपीला लगेचच अटक केली. महत्त्वाची बाब म्हणजे बेपत्ता असलेल्या उबर चालकाची हत्या करणारा त्याचाच मित्र आहे.

कारच्या व्यवहारातून मित्रानेच उबर चालकाची हत्या केल्याचे मानखुर्द पोलिसांच्या तपासातून स्पष्ट झाले आहे. मोहम्मद सलिम अब्दुल करीम वाहीद अन्सारी (३०) असे मृत उबेर चालकाचे नाव आहे. तो १९ जूनपासून बेपत्ता होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्सारी प्रवासी घेऊन पुण्यात गेल्यापासून तो बेपत्ता होता. नातेवाइकांनी संपर्क साधला, पण तो झाला नाही. अखेर त्याच्या भावाने मानखुर्द पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अन्सारीच्या शोधासाठी तीन विशेष पथके तयार करण्यात आली होती.

पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. अन्सारीची कार भोसरी पुणे येथे आढळली. त्यानंतर त्या परिसरात कार पार्क करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली. त्यावेळी उर्स टोलनाक्याजवळ एकाची हत्या झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तिथे धाव घेतली असता तो मृतदेह अन्सारीचा असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी सलीमच्या संपर्कात आलेल्या लोकांची चौकशी केली. पोलिसांनी अन्सारीच्या मोबाइलवर आलेले आणि  त्याने केलेले कॉल याचाही पोलिसांनी शोध घेतला. पोलिसांनी मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरील टोल नाका आणि खासगी ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. पुराव्याच्या आधारे पोलिसांनी आरोपी आदित्यला लातूर येथून अटक केली.

चौकशीदरम्यान आदित्यने सांगितले की काही दिवसांपूर्वी त्याने सलीमशी त्याची गाडी खरेदी करण्याबाबत बोलणे केलं होते. १८ जून रोजी दोघेही दादरमध्ये भेटले आणि तेथून ते पुण्याला निघाले. वाटेतच दोघांमध्ये पैशांवरून वाद झाल. आदित्यने संतापाच्या भरात डॅशबोर्डमध्ये ठेवलेल्या चाकूने सलीमची हत्या केली आणि मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून देऊन पळ काढला. गाडी खराब झाल्यावर, आदित्यने टोइंग व्हॅनच्या मदतीने ती भोसरीतील एका गॅरेजमध्ये सोडली. पोलीस गाडीपर्यंत पोहोचल्यामुळे या प्रकरणाचा उलगडा झाला. 

टॅग्स :Mumbai policeमुंबई पोलीसCrime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई