शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकीय पक्ष ही खासगी प्रॉपर्टी नसून..."; अजित पवार गटाचा शरद पवार गटावर निशाणा
2
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
3
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
4
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
5
BIG Update : अखेर प्रतीक्षा संपली! गौतम गंभीरचं भारताचा 'हेड', महत्त्वाची अपडेट समोर
6
"कायद्याच्या तावडीतून कोणीही सुटू शकत नाही, भारतात येताच प्रज्वल रेवन्ना यांना अटक केली जाईल"
7
Pune Porsche Car Accident: 'बाळा'च्या आजोबांना आणि वडिलांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी; कोर्टात नेमकं काय घडलं?
8
"झारखंडमध्ये करण्यात आली रविवारऐवजी शुक्रवारची सुट्टी'; लव्ह जिहादवर भाष्य करत PM मोदी जोरदार बरसले
9
उद्धव ठाकरे, संजय राऊत परदेशात; १ जूनच्या इंडिया आघाडीच्या बैठकीला दांडी मारणार?
10
रियान परागने सारा-अनन्याचे हॉट फोटो सर्च केले; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
11
"मी पण कलेक्टर बनणार"; टीव्हीवर सूर्यवंशम सिनेमा पाहून UPSC परीक्षा दिली अन्...
12
तरुणी १५ फूट उंच उडाली, ... म्हणून बिल्डर 'बाळ' पळून जाऊ शकला नाही; प्रत्यक्षदर्शीने सांगितले नेमके काय घडले...
13
"ती मुलगी अन् आम्ही बाहेरचे..."; सोनिया दुहन कडाडल्या; सुप्रिया सुळेंवर गंभीर आरोप
14
मुंबई कोस्टल रोडवर श्रद्धा कपूरने चालवली Lamborghini; म्हणाली, 'लेट नाईट ड्राईव्ह...'
15
सेन्सेक्स-निफ्टीनं तेजी गमावली; डिव्हिस लॅब्सचे शेअर वाढले, अदानी समूहाचे सर्व शेअर पडले
16
२२व्या वर्षी अवनीत कौर झाली Engaged? बोटातील रिंग दाखवत म्हणाली- "चांगल्या गोष्टी..."
17
"अल्पवयीन आरोपीसोबत आमदाराचाही मुलगा होता"; पुणे प्रकरणात नाना पटोलेंचा गंभीर आरोप
18
'रुखी सुटी रोटी..' गाण्यावर भगरे गुरुजींच्या लेकीचा इलेक्ट्रिफायिंग डान्स, व्हिडीओ बघाच
19
३१ मे पर्यंत पूर्ण करा Aadhaar-PAN शी निगडीत 'हे' काम, अन्यथा भरावे लागतील दुप्पट पैसे
20
१० दिग्गजांनी जाहीर केले वर्ल्ड कपचे सेमीफायनलिस्ट; टीम इंडियावर सर्वांनी दाखवला विश्वास

गहुंजे बलात्कार व खून प्रकरणी आरोपींना फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा : मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 12:16 PM

गहुंजे येथील विप्रो कंपनीत काम करणाऱ्या युवतीवर २००७ मध्ये सामूहिक बलात्कार करून खून करण्यात आला होता.

पुणे:  बी.पी. ओ कंपनीत काम करणाऱ्या 22 वर्षीय ज्योतिकुमारी हिचा 1 नोव्हेंबर २००७ मध्ये नोकरीच्या शेवटच्या दिवशी गहुंजे येथे आरोपींनी तिच्यावर बलात्कार करून खून केला. त्याप्रकरणी पोलिसांनी कॅबचालक पुरुषोत्तम बोराटे आणि त्याचा साथीदार प्रदीप कोकाडे यांना अटक केली हाती. सत्र न्यायालयाने आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर आरोपींच्या याचिकेवर उच्च व सर्वोच्च न्यायालयांनी ही शिक्षा कायम ठेवली होती  आरोपींनी २०१५ मध्ये राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला होता. मात्र तो ही त्यांनी नाकारला.  आरोपींना सुनावण्यात आलेल्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यात दिरंगाई करण्यात आल्याने मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बी.पी. धर्माधिकारी आणि स्वप्ना जोशी यांनी आरोपींची फाशीची शिक्षा रद्दपातल ठरवत जन्मठेपेच्या शिक्षेचा निर्णय दिला.       ज्योती कुमारी बलात्कार आणि खून प्रकरणातील आरोपी पुरुषोत्तम बोराटे आणि त्याचा साथीदार प्रदीप कोकाडे यांना 24जून रोजी फाशी देण्यात येणार होती.. मात्र शिक्षेला स्थगिती देण्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च व सर्वोच्च न्यायालयाने देखील त्यांचे अपील  फेटाळत फाशीची शिक्षा कायम ठेवली होती. त्यामुळे दोघांनी 2017 मध्ये माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे दयेचा अर्ज दाखल केला होता. ..दया याचिका फेटाळल्यानंतर शिक्षेची अंमलबजावणीस कारागृह प्रशासनाने चार वर्षांचा कालावधी लावला..त्यामुळे फाशीचे वॉरंट कधीही येऊ शकते असा विचार करत आरोपी मृत्यूच्या छायेत जगले . ही बाब जगण्याच्या अधिकाराचे उल्लंघन करणारे असल्याचे दोघांनी केलेल्या याचिकेत नमूद केले आहे..सर्वोच्च न्यायालयाने २०१५ मध्ये या आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर आरोपींनी राष्ट्रपतींकडे आपल्या शिक्षेचा पुनर्विचार व दयेचा अर्ज केला होता. मात्र तो अर्ज घटनेचे गांभीर्य ओळखून राष्ट्रीपतींनी आरोपींचा दया अर्ज नाकारत फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले होते. परंतु, सर्वोच्च न्यायालय व राष्ट्रपतींच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात ४ वर्ष दिरंगाई केल्यानंतर मुंबई न्यायालयाने सोमवारी आरोपींच्या जन्मठेपेच्या शिक्षेचा निर्णय दिला. 

टॅग्स :PuneपुणेhinjawadiहिंजवडीRapeबलात्कारCourtन्यायालयLife Imprisonmentजन्मठेप