शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

Mumbai Drug Case: मुंबईमध्ये एनसीबीने पुन्हा केली मोठी कारवाई, विलेपार्लेमध्ये जप्त केले कोट्यवधीचे हेरॉईन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2021 10:24 IST

Mumbai Drug Case: गेल्या काही दिवसांत मुंबईतील NCBकडून होणाऱ्या कारवाया काहीशा मंदावल्या होत्या. मात्र आता एनसीबीने पुन्हा एकदा सक्रिय होत एक मोठी कारवाई केली आहे.

मुंबई - मुंबईतील आलिशान क्रूझवर सुरू असलेल्या ड्रग्स पार्टीवर केलेली कारवाई आणि आर्यन खान याला केलेल्या अटकेमुळे एनसीबी वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. तसेच एनसीबीचे विभागीस संचालक समीर वानखेडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप झाले होते. त्यामुळे मुंबईतील एनसीबीकडून होणाऱ्या कारवाया काहीशा मंदावल्या होत्या. मात्र आता एनसीबीने पुन्हा एकदा सक्रिय होत एक मोठी कारवाई केली आहे. एनसीबीने मुंबईतील विलेपार्ले परिसरात कारवाई करत कोट्यवधीचे हेरॉईन जप्त केले आहे.

विलेपार्ले येथून कोट्यवधीचे हेरॉईन जप्त केल्यानंतर एनसीबीने याची माहिती दिली. या कारवाईत कोट्यवधीचे हेरॉईन जप्त केल्याचे एनसीबीने सांगितले. तसेच या प्रकरणातील संशयित आरोपींचा शोध घेतला जात असल्याचे एनसीबीकडून सांगण्यात आले. गेल्या १५ दिवसांपासून  एकापेक्षा एक गंभीर आरोपांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला राष्ट्रीय अमली पदार्थ नियंत्रण कक्ष (एनसीबी) बॅकफूटवर आला होता. गेल्या आठवड्यापासून एनसीबीने एकही कारवाई केलेली नव्हती. तसेच कार्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणाचा तपासही थंडावला होता.

एनसीबीचे अधिकारी स्वत:च ड्रग्ज प्लांट करतात, पैसे उकळतात अशा स्वरूपाच्या २६ केसेसच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्या प्राप्त झाल्यानंतर कारवाया थांबविण्याचे आदेश दिले आहेत. जुन्या गुन्ह्यातील आरोपीही शोधले जात नाहीत, असा आरोपही झाला होता. 

टॅग्स :MumbaiमुंबईNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोCrime Newsगुन्हेगारी