शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस तक्रारीनंतरही आजीबाईंचे खाते रिकामेच! सायबर ठगांनी दोन वेळा घातला गंडा

By मनीषा म्हात्रे | Updated: September 12, 2022 18:27 IST

चुनाभट्टी येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: बँक खात्याची KYC अपडेट करण्याच्या बहाण्याने डेबिट कार्डची माहिती आणि मोबाईलवर आलेले OTP घेत खात्यातून रक्कम लंपास केली. त्यानंतर खात्याची गोपनीय माहिती चोरी करून खात्यातील रकमेवर हात साफ केल्याचा धक्कादायक प्रकार चुनाभट्टीमध्ये समोर आला आहे. या प्रकरणी चुनाभट्टी पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहेत.

चुनाभट्टी येथील रहिवासी असलेल्या राधा (७२) या एका फार्मास्यूटिकल कंपनीतून सेवानिवृत्त झाल्या आहेत. त्यांचे कॅनरा बँकेच्या चूनाभट्टी आणि धारवाड, नारायणपूर येथील शाखेमध्ये तीन स्वतंत्र बचत खाती आहेत. मार्च महिन्यात चूनाभट्टी येथील कॅनरा बँकेतून अमित मिश्रा बोलत असल्याचे सांगणाऱ्या व्यक्तीने केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून डेबिट कार्डची माहिती मिळवली. पुढे, मोबाईलवर आलेले  ओटीपी घेत खात्यातून तीन व्यवहार करत दीड लाख रुपयांवर डल्ला मारला. यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार,   चुनाभट्टी पोलिसांनी भादंवि आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या अन्वये गुन्हा दाखल केला होता.

राधा या ७ सप्टेंबरला बचत खात्यांच्या पासबुकमध्ये नोंदी करून घेण्यासाठी गेल्या. त्यांनी पासबुक तपासली असता तिन्ही बचत खात्यातून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने तिन्ही खात्यातून गैरव्यवहार करत एकूण ०३ लाख २५ हजार २२९ रुपये लंपास केले असल्याची माहिती त्यांना समजताच त्यांना पुन्हा धक्का बसला. त्यांनी, पुन्हा चुनाभट्टी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीcyber crimeसायबर क्राइमMumbaiमुंबईPoliceपोलिसbankबँक