शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

तो आला, बोलला अन् ९ तोळ्याचं सोनं घेऊन पसार झाला...

By मनीषा म्हात्रे | Updated: September 12, 2022 21:48 IST

दुकानाबाहेर थांबलेल्या दुचाकीस्वारांसोबत केलं पलायन

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: दुकानात रेती खरेदीसाठी आलेल्या ग्राहकाने बोलण्यात गुंतवून दुकानमालकाचे साडे चार लाख रुपये किंमतीचे ९ तोळ्यांचे दागिने पळविल्याची धक्कादायक  घटना अंधेरीत घडली. या प्रकरणी MIDC पोलिसांनी दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवत अधिक तपास केला. मालाड परिसरातील रहिवासी असलेले ६५ वर्षीय तक्रारदार यांचे अंधेरीत रेतीविक्रीचे दुकान आहे. शनिवारी सकाळी १० च्या सुमारास एक अनोळखी व्यक्ती दुकानात आला. त्याने मंदिराच्या कामासाठी रेतीची गोणी हवी असल्याचे सांगितले.

त्यानुसार, तीन गोणीचे बाराशे रुपये त्यांच्या समोर ठेवले. पुढे, सोन्याचे दागिने विक्रीचे दुकान सुरु असल्याचे सांगत ठग ग्राहकाने त्यांच्याशी संवाद साधण्यास सुरुवात केली. पुढे बोलण्यात गुंतवून त्यांच्या जवळील, अंगठी, सोनसाखळी हातात घेतली. त्यानंतर, टेबलावरील प्लास्टिक बॅगेत ठेवल्याचे दाखवून दुकानाबाहेर थांबलेल्या दुचाकी स्वारांसोबत तो निघून गेला. काही वेळाने त्यांनी प्लास्टिक बॅग उघडून पाहताच त्यात त्यांचे दागिने मिळून आले नाही. अखेर, यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव  घेत तक्रार दिली. यामध्ये त्यांचे साडे चार लाख रुपये किंमतीचे ९ तोळ्याच्या दागिन्यांवर ठगाने डल्ला मारला आहे.

या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. परिसरातील सीसीटीव्हीच्या मदतीने पोलीस अधिक तपास करत आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबईRobberyचोरी