शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
4
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
5
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
6
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
7
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
8
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
9
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
10
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
11
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
12
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
13
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
14
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
15
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
16
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
17
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
18
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
19
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
20
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 12:40 IST

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB) मुंबई युनिटने अंमली पदार्थ तस्करांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. नागपुरात एका आंतरराज्य गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश केला.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB) मुंबई युनिटने अंमली पदार्थ तस्करांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. नागपुरात एका आंतरराज्य गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश केला. शनिवारी केलेल्या या धडक कारवाईत पथकाने तब्बल २१० किलो गांजा जप्त केला असून या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. जप्त केलेला गांजा मेटल शीट्सच्या आड लपवून पश्चिम बंगालच्या ट्रकमधून नेला जात होता. २० कोटींचा हा गांजा असल्याचं म्हटलं जात आहे. 

मिळालेल्या माहितीच्या आधारे, NCB च्या पथकाने नागपूर परिसरात पश्चिम बंगाल पासिंगच्या एका ट्रकची झडती घेतली. वरवर पाहता ट्रकमध्ये मेटल शीट्स भरलेल्या दिसत होत्या, मात्र नीट तपासणी केली असता, या मालाच्या आत अत्यंत शिताफीने लपवलेली गांजाची पाकिटं आढळून आली. याप्रकरणी ट्रकसह पी. कुमार आणि आर. कुमार या दोन जणांना अटक करण्यात आली.

ओडिशा ते महाराष्ट्र कनेक्शन 

अटक केलेल्या आरोपींची कसून चौकशी केली असता, हा गांजा ओडिशातील संबलपूर येथून आणल्याचं समोर आलं आहे. संबलपूर हा परिसर अवैध गांजा पुरवठ्याचं मुख्य केंद्र मानलं जातं. या माहितीच्या आधारे NCB ने तातडीने पुढील कारवाई करत नागपूरमधील मुख्य वितरक पाटील आणि वर्मा या दोघांनाही अटक केली आहे.

'या' शहरांमध्ये होणार होता पुरवठा 

तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून हा तब्बल २१० किलो गांजा महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये पोहोचवण्यात येणार होता. यात प्रामुख्याने:नागपूर, अमरावती, अकोला, नाशिक, पुणे आणि मुंबई या शहरांमधील स्थानिक पेडलर्स आणि किरकोळ विक्रेत्यांना हा साठा विकला जाणार होता. या रॅकेटमध्ये अजून कोणाचे हात गुंतले आहेत, याचा तपास आता NCB करत आहे "संघटित गुन्हेगारी सिंडिकेट मोडून काढण्यासाठी आणि सार्वजनिक आरोग्य जपण्यासाठी NCB कटिबद्ध आहे. नशामुक्त भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरूच राहती," असं NCB ने स्पष्ट केलं आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : NCB Busts Interstate Ganja Racket, Seizes 210 kg, Four Arrested

Web Summary : NCB busted an interstate ganja smuggling racket in Nagpur, seizing 210 kg of ganja hidden in a truck from West Bengal. Four individuals were arrested. The drugs, worth ₹20 crore, were intended for distribution across Maharashtra cities. Investigation is ongoing to identify other involved parties.
टॅग्स :NCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोDrugsअमली पदार्थMumbaiमुंबईnagpurनागपूरPoliceपोलिसArrestअटक