शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई: झाडावर धडकून कारचा अपघातात; दोघांचा मृत्यू, सात जण जखमी

By मनीषा म्हात्रे | Updated: October 13, 2022 20:56 IST

मुंबईच्या पूर्व द्रुतगती महामार्गावरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: तेथील पुर्व द्रुतगती महामार्गावरुन भरधाव वेगाने जात असलेल्या इनोव्हा कारचा झाडाला धडकून झालेल्या अपघातात दोघांचा बळी गेल्याची घटना बुधवारी रात्री उशिराने कांजूरगाव परिसरात घडली. जुनेद सलीम कुरेशी (२६) आणि साहिल कुरेशी (१८) अशी मृतांची नावे असून दोघेही कसाईवाडा, कुर्ला येथील रहिवासी आहेत. या अपघातात सात जण जखमी झाले असून यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री सव्वाबाराच्या सुमारास पूर्व द्रुतगती महामार्गावर कांजूरगाव बस थांब्याजवळ ही घटना घडली. पूर्व द्रुतगती महामार्गावरुन भरधाव वेगाने जात असलेल्या इनोव्हा कारचा (क्रमांक एम. एच. ०२ ए. एल. ५१८५)  २६ वर्षीय कारचालक जुनेद सलीम कुरेशी याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. आणि गाडी मार्गावरील एका पिंपळाच्या झाडाला धडकली. या भीषण अपघातात कारचा चुराडा झाला. घटनेची वर्दी लागताच विक्रोळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने कारमधील नऊ जखमींना बाहेर काढले. यातील गंभीर जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. तर, अन्य जखमींना मुलुंडच्या वीर सावरकर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वी चालक जुनेद कुरेशी आणि सहप्रवासी साहिल कुरेशी यांना डाॅक्टरांनी उपचारांपूर्वीच मृत घोषित केले. अपघातातील गंभीर जखमी अयात आयान हाजीम कुरेशी (१८) याच्यावर फोर्टिस रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. अन्य सहा जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

भरधाव वेगामुळेच अपघात!

पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात कार चालक कुरेशी याचा गाडीवरील ताबा सुटून अपघात झाल्याचे स्पष्ट झाले. अखेर पोलिसांनी सरकार तर्फे याप्रकरणी फिर्याद दाखल करत कुरेशी विरोधात गुन्हा नोंदवत कारवाई केली आहे. याप्रकरणी विक्रोळी पोलीस अधिक तपास करत आहे.

टॅग्स :AccidentअपघातMumbaiमुंबईhighwayमहामार्गcarकार