शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बोलणी करण्यास आले अन् सोन्याचा हार चोरून गेले; डॉक्टर कुटुंबीयांची पोलिसांत धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 06:13 IST

मुलुंडमधील घटना; फोटो व्हायरल करून बदनामीची दिली धमकी

मनीषा म्हात्रे मुंबई : डॉक्टर मुलाचे लग्न करण्यासाठी वधूचा शोध सुरू असतानाच सोशल मीडियावरून एक स्थळ आले. स्थळ आवडले म्हणून बघण्याचा कार्यक्रम ठरला. त्यानंतर मात्र वराचे घर बघण्यासाठी आलेल्या वधूच्या कुटुंबीयांनीच मुलाच्या आईचा तब्बल साडे सात तोळ्याचा हार घेऊन पळ काढल्याची घटना मुलुंडमध्ये घडली. विशेष म्हणजे, मुलाच्या कुटुंबीयांनी वधू पक्षाला हार नेल्याबाबत विचारणा करताच वधूच्या आईने थेट काही फोटो व्हॉट्सअपवर व्हायरल करून बदनामीची धमकी दिली. त्यामुळे मुलाचे लग्न ठरविणे एका कुटुंबाला चांगलेच डोकेदुखीचे ठरले आहे. मुलुंड पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंद करुन तपास सुरु केला आहे.

मुलुंड पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, मुलुंड एलबीएस मार्गावर राहणाऱ्या ५३ वर्षीय  महिलेच्या तक्रारीवरून पोलीस अधिक तपास करत आहे. त्यांचे पती एका नामांकित रबर कंपनीत व्यवस्थापक पदावर आहेत. तर मुलगा डॉक्टर आहे. गेल्या काही दिवसांपासून मुलासाठी चांगल्या वधूच्या शोधात असताना, सोशल मिडियावर राजश्री घोडके व ईश्वर घोडके यांच्याशी 3 महिन्यापूर्वी ओळख झाली. घोड़के दाम्पत्य वेगवेगळी स्थळ दाखवत होते. २५ जानेवारी रोजी त्यांना घोडके कुटुंबियांचा लग्नासाठी प्रस्ताव पाठवला. 

२३ एप्रिल रोजी भेटण्याचा कार्यक्रम ठरला. दुपारी २ च्या सुमारास वधू आई, वडील, बहीण आणि आजीसोबत येथील एका हॉटेलमध्ये भेटले. तेथे प्राथमिक बोलणी झाल्यानंतर, मुलीच्या कुटुंबियानी घर दाखवण्यासाठी आग्रह धरला. त्यानुसार, ५ च्या सुमारास सर्वजण त्यांच्या मुलुंडच्या घरी आले. घर बघत असताना फोटो काढण्याचा बहाणा करत मुलीच्या वडिलांनी यांचा पावणे चार लाख रुपये किंमतीचा ७ तोळे ७ ग्रँमचा हार तुटला असल्याचे सांगून बोलण्यात गुंतवून स्वतःकडे घेऊन निघून गेला. तक्रारदार यांनी मुलीच्या आईला फोन करून हार बाबत चौकशी केली. तेव्हा तिने तुझे फोटो व्हॉट्सअपवर टाकुन बदनामी करेन. हार विसरून जा,  तुला काय करायचे ते करून घे अशी धमकी देत मोबाईल क्रमांक ब्लॉक केला. घडल्याप्रकाराने तक्रारदार यांना धक्का बसला. याबाबत त्यांनी मुलुंड पोलिसांत तक्रार केली आहे. 

मुलीचीही धमकी२४  एप्रिल रोजी त्यांनी पुन्हा मुलीला कॉल करून हाराबाबत चौकशी केली. तेव्हा, मुलीने या लग्नाला आईचा विरोध असल्यामुळे घर सोडले आहे. मला तुमच्याच मुलाशी लग्न करायचे असल्याचे तिने सांगितल्याने काही तरी गडबड असल्याचा संशय तक्रारदार याना येताच त्यांनी, तात्काळ सोमवारी मुलुंड पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.

 तपास सुरूमहिलेच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवत, तक्रारीची पडताळणी करण्यात येत आहे. चौकशीअंती योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांतीलाल कोथिंबीरे यांनी दिली. तसेच मुलीचे कुटुंबीय कर्नाटकला असून ते आल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे.

टॅग्स :Policeपोलिसfraudधोकेबाजी