शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

मुकीम अहमद, शेख शफी हत्याकांड: आठ आरोपींना पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 13:55 IST

अकोला : आम आदमी पक्षाचे नेते मुकीम अहमद अब्दुल बशीर व त्यांचे सहकारी मौलवी शेख शफी शेख कादरी यांच्या हत्याकांड प्रकरणातील अटकेत असलेल्या आठ आरोपींना पोलिसांनी रविवारी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने आरोपींना १० आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

अकोला : आम आदमी पक्षाचे नेते मुकीम अहमद अब्दुल बशीर व त्यांचे सहकारी मौलवी शेख शफी शेख कादरी यांच्या हत्याकांड प्रकरणातील अटकेत असलेल्या आठ आरोपींना पोलिसांनी रविवारी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने आरोपींना १० आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या हत्याकांड प्रकरणातील सात आरोपी अद्यापही फरार असून, पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.दामले चौकातील केदार मंदार अपार्टमेंटमधील रहिवासी मुकीम अहमद व बुलडाण्याच्या साखरखेर्डा या गावातील त्यांचा सहकारी शफी कादरी हे अकोला शहरातून ३० जुलै रोजी बेपत्ता झाले होते. २ आॅगस्ट रोजी मुकीम अहमद यांच्या पत्नी शहनाज यांनी खदान पोलीस ठाण्यात ते बेपत्ता झाल्याची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी सात जणांविरुध्द अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी सहा पथकांचे गठन करून या प्रकरणाचा तातडीने छडा लावण्याचा आदेश दिला. यामधील स्थानिक गुन्हे शाखेचे साहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांचे पथक गत तीन दिवसांपासून साखरखेर्डा जंगलात ठाण मांडून बसल्यानंतर त्यांनी दोघांचेही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत शोधले. या दोघांची हत्या मौलवी तसब्बूर कादरी रा. अकोला, जब्बार खा सत्तार खा, सै.अस्लम सै. हुसेन दोघेही रा. वाकद बुलडाणा, शेख इम्रान शेख कदीर व शेख मुक्तार शेख नूर रा. मेहकर, शब्बीरशहा अन्वरशहा रा. खाकडी बुलडाणा, कारचालक संदीप आत्माराम दातार रा. जानेफळ, मो. शारीक मो. अब्दुल हक रा. चिखली, मुजफ्फर हुसेन साखरखेर्डा, शेख चांद, रौशन खान जब्बार खान पठाण रा. मलकापूर पांग्रा बुलडाणा, जावेद ऊर्फ दगड्या रा. मलकापूर पांग्रा बुलडाणा, शेख कौसर शेख अफसर साखरखेर्डा, फिरोज ऊर्फ भोले रा. मलकापूर पांग्रा बुलडाणा, शेख अजीम साखरखेर्डा बुलडाणा या १४ आरोपींनी केल्याचे तपासात उघड झाले. त्यानंतर यामधील आठ आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांना रविवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपींना १० आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणातील सात आरोपी अद्यापही फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrimeगुन्हाMurderखून