शहरं
Join us  
Trending Stories
1
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
2
बिहारमध्ये कितपत खरे ठरले होते ओपिनियन पोल? आताच्या सर्व्हेत कुणाचं सरकार? 'इंटरेस्टिंग' आहेत आकडे!
3
“‘आय लव्ह मोहम्मद’ यात काही वाईट-चुकीचे नाही”; धीरेंद्र शास्त्रींना नेमके म्हणायचे तरी काय?
4
सोनम वांगचुकच्या अटकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला नोटीस बजावली; पत्नी गीतांजली यांनी केल्या दोन मागण्या
5
आता परतीचे दोर नाही, युतीची चर्चा फार पुढे गेलीय; मनसेसोबतच्या युतीवर संजय राऊत असं का म्हणाले?
6
संरक्षण करारानंतर सौदी अरेबियाची पाकिस्तानला आणखी एक मोठी भेट; ३० लाख लोकांना रोजगार मिळणार
7
Manas Polymers Listing: १५३ रुपयांवर लिस्ट झाला हा स्वस्त IPO; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना ९०%चा फायदा, झाले मालामाल
8
गांजा, दारू आणि नको त्या अवस्थेत...; रेव्ह पार्टीवर धाड, तरुण-तरुणींसह ६५ जण पोलिसांच्या ताब्यात
9
Cough Syrup : "लेकाच्या उपचारासाठी रिक्षा विकली, डायलिसिससाठी नव्हते पैसे, ३ लाखांचा खर्च"; वडिलांचा टाहो
10
राम मंदिरावर लक्ष्मी प्रसन्न! १५३ कोटी दान, १७३ कोटी बँक व्याज; कमाई आकडे पाहून व्हाल अवाक्
11
विमानात बिघाड झाल्यानंतर सक्रिय होणारा 'RAT' नेमका आहे काय? काय आहे त्यात विशेष? जाणून घ्या...
12
दहा वर्षांपासून मुलांना Coldrif सिरप देतोय; 'त्या' मुलांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरची प्रतिक्रिया
13
Coldrif Cough Syrup: मुलांच्या जीवावर उठलं कफ सिरप; कंपनीची १६ वर्षांपासून ना झाली वार्षिक बैठक, ना बॅलन्स शीटही झाली अपडेट
14
४ दिवसांपूर्वी शिंदेसेनेत प्रवेश अन् आज भाजपा मंत्री नितेश राणेंवर लावला गंभीर आरोप, म्हणाले...
15
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! टाटा-रिलायन्ससारख्या २४० दिग्गज कंपन्यांत पैसे लावा; कोणी आणली ऑफर?
16
३ महिने भरपूर पैसा, ४ राशींचे आयुष्यच बदलेल; कल्पनेपलीकडे यश-लाभ, बाबा वेंगांचे मोठे भाकित!
17
रेखा झुनझुनवालांनी 'या' सरकारी बँकेचे आणखी शेअर खरेदी केले, LIC चाही मोठा डाव; करतोय मालामाल!
18
गाझा युद्धविराम योजना: ट्रम्प-नेतन्याहू यांच्यात फोनवर तुफान वाद! अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर संतापले इस्रायलचे पंतप्रधान
19
Cough Syrup : "कफ सिरपने मुलाचा जीव घेतला, उपचारासाठी जमीन गहाण ठेवून ४ लाखांचं कर्ज, पण... "
20
'या' अभिनेत्रीला आदर्श मानते 'सैयारा' गर्ल अनीत पड्डा; म्हणाली, "रिलीजनंतर १० मिनिटं तिच्याशी..."

महावितरण, वीजग्राहकांना गंडा घालणाऱ्यावर गुन्हा; वीजबिल कमी करण्याचे प्रलाेभन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2021 00:34 IST

दाेन लाख ४० हजारांची फसवणूक केल्याचे उघड

डोंबिवली : वीजबिल कमी करण्याचे आमिष दाखवून वीजग्राहकांकडून रोख रक्कम स्वीकारून स्वतःच्या रक्कम शिल्लक नसलेल्या बँक खात्याचा धनादेश महावितरणकडे जमा करून महावितरणसह संबंधित ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या एका भामट्याविरुद्ध शनिवारी गुन्हा दाखल झाला.

साहिल अझगर पटेल (रा. बिस्मिल्ला हॉटेलजवळ, मौलबी चौक, गोविंदवाडी, कल्याण पश्चिम) असे या भामट्याने नाव असून त्याने एकूण २३ ग्राहक व महावितरणची दोन लाख ४० हजार ७०० रुपयांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. महात्मा फुले पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल असून, तपासात फसवणुकीची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. 

कल्याण पश्चिम विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर राठोड आणि वित्त व लेखा विभागाचे उपव्यवस्थापक गजानन राठोड यांना साहिल पटेल याने विविध ग्राहकांच्या वीजबिलासाठी दिलेले धनादेश न वटल्याने संशय आला. त्यामुळे संबंधित ग्राहकांना प्रत्यक्ष कार्यालयात बोलावून राठोड यांनी चौकशी केली असता धक्कादायक बाब उघडकीस आली. परिमंडल कार्यालयाच्या परिसरातील दोन, तहसील कार्यालयासमोरील एक व शिवाजी चौकातील एक अशा विविध पतसंस्थांच्या चार बिलभरणाकेंद्रात येणाऱ्या ग्राहकांना वीजबिल कमी करून देण्याचा बहाणा करून आरोपीने त्यांच्याकडून रोख रक्कम घेतली. ती हडप करून आरोपीने संबंधित ग्राहकांच्या वीजबिलापोटी स्वतःचा आयसीआयसीआय या रक्कम शिल्लक नसलेल्या बँकेचा धनादेश बिलभरणा केंद्रात जमा करून ग्राहकांना त्याची पावती दिली. परंतु, हे धनादेश न वटल्याने कल्याण पश्चिम विभाग कार्यालयात परत आल्याने आरोपीचे कारस्थान उघड झाले. उपव्यवस्थापक गजानन राठोड यांच्या फिर्यादीवरून महात्मा फुले पोलीस ठाण्यात साहिल पटेलविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

मीटर रीडिंग, ग्राहक वर्गवारी अथवा वीजभार यासंदर्भात चुकीची नोंद झाली असेल तरच महावितरणच्या प्राधिकृत अधिकाऱ्याकडून वीजबिल दुरुस्त केले जाते. इतर कोणालाही वीजबिलात दुरुस्तीचा अधिकार नाही. त्यामुळे वीजग्राहकांनी वीजबिल कमी करून देण्याचे आमिष दाखविणाऱ्या कोणत्याही घटकाच्या आमिषाला बळी न पडण्याची दक्षता घ्यावी व फसवणूक टाळावी, असे आवाहन महावितरणने केले आहे. अशाच प्रकारच्या फसवणुकीबाबत १५ मार्च रोजी उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दीपक महादेवप्रसाद श्रीवास्तव (रा. उल्हासनगर कॅम्प-३) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, त्यालाही पोलिसांनी अटक केली आहे. या पार्श्वभूमीवर वीजग्राहकांनी कोणत्याही परिस्थितीत वीजबिलाचा भरणा डिजिटल माध्यमातून ऑनलाइन किंवा महावितरणच्या अधिकृत वीजबिल भरणा केंद्रातच करून छापील पावती घ्यावी. वीजबिल भरणा करण्याबाबत महावितरणबाह्य कोणत्याही व्यक्ती अथवा घटकांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन  करण्यात आले आहे.

वीजमीटर काढण्याचे सत्र सुरूचडोंबिवली : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत आदेश देऊनही शहरात वीजबिल न भरल्याच्या कारणाने सर्रास वीजमीटर काढण्यात येत असून नागरिक हैराण झाले आहेत. शेलारनाका परिसरातील तुकाराम साबळे यांनी सांगितले की, सातत्याने आम्हाला भरमसाट बिले दिली जात आहेत. त्यात आता थेट मीटर काढण्यात येत आहेत. शासन आदेशाची पायमल्ली होत असून सामान्यांनी जगायचे तरी कसे? असा सवाल त्यांनी केला. वीजबिल पाठविल्यावर ती भरण्याची क्षमता नसेल तर टप्पे करून देण्याचे अधिकारी सांगतात, पण तरीही प्रत्यक्ष मात्र अंमलबजावणी तशी न होता मीटर काढण्याची कार्यवाही होत आहे. गोग्रासवाडी भागातही अशा समस्या भेडसावत असल्याने नागरिक हैराण आहेत. यासंदर्भात महावितरण अधिकाऱ्यांनी सांगितले की, आधी पवार तसे म्हणाले होते, पण हाऊस संपताना पुन्हा ज्यांची बिले भरमसाट आहेत त्यांचे मीटर काढण्यात यावेत, असे आदेश पारित करण्यात आले होते. त्यानुसार कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :mahavitaranमहावितरणPoliceपोलिस