शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चौकशीत पकडली गेली तर म्हणाली पत्नी - पती मारत होता, मी पण लाथा मारल्या तर मृत्यू झाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 16:18 IST

Madhya Pradesh Crime News : गुन्हेगार हा शेवटी पकडलाच जातो. भलेही त्याने गुन्हा करण्याची पद्धत इंटरनेटवर शोधली असू देत किंवा क्राइम पेट्रोलसारख्या सीरिअल बघून शोधली असावी.

गुन्हेगार नवीन असो वा प्रोफेशनल पोलिसांच्या नजरेतून जास्त दिवस वाचू शकत नाहीत. गुन्हेगार हा शेवटी पकडलाच जातो. भलेही त्याने गुन्हा करण्याची पद्धत इंटरनेटवर शोधली असू देत किंवा क्राइम पेट्रोलसारख्या सीरिअल बघून शोधली असावी. अशीच एक घटना मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) ग्वाल्हेरमधून (Gwalior) समोर आली आहे. इथे एका पत्नीचा गुन्हा साधारण ६ महिन्यांनंतर समोर आला.

या प्रकरणात सुरूवातीला नशीबाने साथ दिल्यावरही एका पत्नीचा गुन्हा काही केल्या जास्त काळ लपू शकला नाही. पतीच्या पोटात लाथ मारून त्याचा जीव घेणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान तरूणाच्या हत्येनंतर त्याच्या मृत्यूचं गुपित उलगडलं गेलं होतं.

कसा झाला पतीचा मृत्यू

पोलिसांनुसार बल्लू उर्फ बलराम चौधरीचा मृत्यू ९-१० एप्रिल दरम्यान रात्री झाला होता. त्यावेळी चौकशी दरम्यान पत्नीने पोलिसांना सांगितलं होतं की, पतीच्या पोटात जोरात दुखत होतं. डॉक्टरकडे घेऊन गेलो तर ते म्हणाले की, त्याचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे झाला आहे. पण कुटुंबियांनी पत्नीच्या सांगण्यावर विश्वास नव्हता. त्यामुळे त्यांनी पोलिसांना चौकशी करण्यास सांगितले.

पत्नीने मान्य केला गुन्हा

एका रिपोर्टनुसार कुटुंबियांच्या तक्रारीनुसार, चौकशी पुढे नेण्यात आली. आरोपी पत्नीने पोलिसांना सांगितलं की, पती-पत्नीमध्ये नेहमीच भांडणं होत होती. त्यांचं आपसात अजिबात पटत नव्हतं. सुरूवातील पोस्टमार्टम रिपोर्टवर कुणीच लक्ष दिलं नाही. पण मृतकाचे नातेवाईक सतत पोलिसांकडे चौकशीची मागणी करत होते. 

अशात पोलिसांनी पोस्टमार्टम रिपोर्ट पुन्हा पाहिला तर समजलं की, तरूणाचा मृत्यू पोटात मार लागल्याने झाला आहे. यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केली तेव्हा पत्नीने मान्य केलं की, घटनेच्या दिवशी दोघांमध्ये वाद झाला होता. पत्नीने सांगितलं की, 'त्या दिवशी माझा पती मला दिवसभर मारत होता. त्यावेळी मला वाचवणारं कुणीच नव्हतं. त्यामुळे मी सुद्धा त्याला लाथा - बुक्क्या मारल्या तर त्याचा मृत्यू झाला'. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारी