शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

गर्लफ्रेन्डचे खर्च उचलण्यासाठी नव्हते पैसे, बॉयफ्रेन्डने रचलं स्वत:च्या अपहरणाच नाट्य आणि मग....

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2021 15:35 IST

Madhya Pradesh Crime News : भिंड जिल्ह्यातील गोहद पोलीस स्टेशनमध्ये सुरेंद्र सिंह कुशवाह नावाच्या व्यक्तीने ६ नोव्हेंबरला आपला १८ वर्षीय मुलगा संदीप बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती.

Madhya Pradesh Crime News : मध्य प्रदेशच्या भिंड जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका तरूणाने आपल्या गर्लफ्रेन्डचे खर्च उचलण्यासाठी स्वत:च्या अपहरणाचं नाटक रचलं आणि घरातील लोकांकडून अडीच लाख रूपये मागितले. पोलिसांच्या चौकशीतून हा खुलासा झाला. या घटनेसाठी आरोपी तरूणाने एक मोबाइल अ‍ॅपचा आधार घेतला होता. पोलिसांनी तरूणाला अटक केली आहे.

भिंड जिल्ह्यातील गोहद पोलीस स्टेशनमध्ये सुरेंद्र सिंह कुशवाह नावाच्या व्यक्तीने ६ नोव्हेंबरला आपला १८ वर्षीय मुलगा संदीप बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. त्यांनी सांगितलं की, तो घरातून गेला आणि मग परत आलाच नाही. ८ नोव्हेंबरला पीडित वडिलाकडे एक फोन आला, ज्यात त्यांना सांगण्यात आलं की, त्यांचा मुलाचं अपहरण करण्यात आलं आहे आणि त्याला सोडवण्यासाठी  अडीच लाख रूपये पाहिजे. मुलाचं अपहरण झाल्याचं ऐकून घाबरलेले वडील पोलीस स्टेशनमध्ये गेले. 

मुलाच्या वडिलांनी पोलिसांना याची माहिती दिल्यावर पोलिसांची चौकशी सुरू केली. चौकशीनंतर त्यांना  संदीप ग्वाल्हेरमध्ये असल्याची माहिती मिळाली. मोबाइल लोकेशन  ट्रॅक करत पोलीस त्या ठिकाणापर्यंत पोहोचले. तरूणाने आधी तर पोलिसांनी अनेक खोट्या कथा सांगितल्या. शेवटी त्याने मान्य केलं की, त्याने त्याच्या अपहरणाचं नाटक रचलं होतं. तो त्याच्या मर्जीने घरातून पळून गेला होता. त्याला पैशांची गरज होती आणि घरातून त्याला पैसे मिळत नव्हते. म्हणून त्याने हे कृत्य केलं.

पोलिसांनी सांगितलं की, तरूणाचं गुरूग्राममधील तरूणीसोबत प्रेम प्रकरण सुरू होतं. तिला भेटायला जाण्यासाठी आणि तिचे खर्च उचलण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. त्याने कारण सांगत घरीही पैसे मागितले होते. पण त्यांनी दिले नाही. त्यामुळे तो घरातून गायब झाला. त्यानंतर दोन दिवसांनी मोबाइलमध्ये अ‍ॅप डाऊनलोड केलं आणि त्याद्वारे आवाज बदलून वडिलांना स्वत:च फोन केला. तसेच पैशांची मागणी केली. 

 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशKidnappingअपहरणCrime Newsगुन्हेगारी