शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

खा. डेलकर आत्महत्याप्रकरण: दादरा नगर हवेलीच्या प्रशासकांसह ९ जणांविरोधातील गुन्हा रद्द

By दीप्ती देशमुख | Updated: September 8, 2022 20:26 IST

दादरा नगर हवेलीचे सात वेळा निवडून आलेले खासदार मोहन डेलकर (५८) यांनी २२ फेब्रुवारी २०२१ रोजी मरिन ड्राईव्ह येथील एका नामांकित हॉटेलमध्ये आत्महत्या केली

मुंबई : खासदार मोहन डेलकर आत्महत्येप्रकरणी दादर नगर हवेली केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक प्रफुल्ल खोडा पटेल यांच्यासह नऊ जणांवर मुंबई पोलिसांनी नोंदविलेला गुन्हा उच्च न्यायालयाने गुरुवारी रद्द केला.  प्रफुल्ल कोडा पटेल व अन्य आठ जणांनी डेलकर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा मरिन ड्राईव्ह पोलिसांनी नोंदविला होता.

दादरा नगर हवेलीचे सात वेळा निवडून आलेले खासदार मोहन डेलकर (५८) यांनी २२ फेब्रुवारी २०२१ रोजी मरिन ड्राईव्ह येथील एका नामांकित हॉटेलमध्ये आत्महत्या केली. पटेल यांच्यासह नऊजणांकडून डेलकर यांची छळवणूक सुरू होती. त्यांच्याकडून डेलकर यांना अपमानास्पद वागणूक दिली जात होती. त्यामुळे त्यांनी  आत्महत्या केल्याची तक्रार डेलकर यांचा मुलगा अभिनव डेलकर यांनी पोलिसांत केली होती. त्यानंतर मरिन ड्राईव्ह पोलिसांनी पटेल, तत्कालीन पोलीस अधीक्षक, उपजिल्हाधिकारी व अन्य सहा जणांवर डेलकर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल केला. गुन्हा रद्द करण्यासाठी पटेल यांच्यासह नऊ जणांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.

न्या. पी. बी. वराळे व एस. कुलकर्णी यांनी  पटेल व अन्य आरोपींवर मुंबई पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द केला. 'याचिकाकर्त्यांच्या ( पटेल व अन्य आरोपी) यांच्या युक्तिवाद योग्य आहे आणि त्यात तथ्यही आहे. कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी गुन्हा रद्द करणे योग्य आहे,' असे खंडपीठाने निकालात म्हटले आहे. 

'सर्व बाबींचा विचार करता आम्हाला याचिकाकर्त्यांच्या युक्तिवादात तथ्य आणि वस्तुस्थिती आढळते. कायद्याच्या प्रक्रियेचा गैरवापर रोखण्यासाठी फौजदारी दंडसंहिता कलम ४८२ अंतर्गत न्यायालयाने अधिकारांचा वापर करणे योग्य आहे. अभिनव डेलकर यांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यात येत आहे,'  असे न्यायालयाने म्हटले.

मरिन ड्राईव्ह पोलिसांनी पटेल व आठ जणांवर ९ मार्च २०२१ रोजी डेलकर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल व  अट्रोसिटी कायद्यातील काही तरतुदींअंतर्गत गुन्हा दाखल केला.

पटेल, तत्कालीन जिल्हाधिकारी संदीप कुमार सिंह, तत्कालीन पोलीस अधीक्षक शरद दराडे, तत्कालीन उपजिल्हाधिकारी अपूर्वा शर्मा, उपविभागीय अधिकारी मनस्वी जैन, पोलीस निरीक्षक (सिल्वासा) मनोज पटेल, दादरा नगर हवेली प्रशासकीय विभागाचे अधिकारी रोहित यादव, राजकीय अधिकारी यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. राजकीय नेते फत्तेसिंग चौहान आणि सिल्वासाचे तत्कालीन तलाठी दिलीप पटेल यांनी त्यांच्या पदाचा आणि अधिकारांचा गैरवापर करून जाणीवपूर्वक डेलकर यांच्या विरोधात कट आणि योजना आखून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप पोलिसांनी नोंदविला होता.

निकाल ५ जुलै रोजी राखून ठेवला आणि गुरुवारी निकाल दिला.

डेलकर मृत्यूपूर्वी एक वर्ष दबावात होते. डेलकर यांचे  एसएसआर कॉलेज ऑफ फार्मसी अँड मॅनेजमेंट या संस्थेवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासन त्यांचा छळ करत होते. तसेच त्यांना आगामी निवडणूक लढवण्यापासून प्रशासन रोखत असल्याचा आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला होता.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdadra-and-nagar-haveli-pcदादरा आणि नगर हवेलीPoliceपोलिसCourtन्यायालय