शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

Shocking! ऐनवेळी गर्लफ्रेन्डने लग्नास नकार दिला, तरूणाने उचललं हे धक्कादायक पाउल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2021 17:21 IST

दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, मध्य प्रदेशच्या धारमधील शेतकरी आई-वडिलांचा मुलगा राजेश भामेचं पोलीस दलात भरती होण्याचं स्वप्न होतं.

प्रेयसीसोबतचं लग्न फिसकटल्याने तणावात असलेल्या तरूणानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कॉलेजमध्ये असताना तरूणीसोबत मैत्री आणि नंतर प्रेम झालं. इतकंच नाही तर दोघांच्या लग्नाची बोलणीही सुरू होती. पण अचानक तरूणीने संपर्क तोडला. त्यामुळे एकाएकी धक्का बसल्याने त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, मध्य प्रदेशच्या धारमधील शेतकरी आई-वडिलांचा मुलगा राजेश भामेचं पोलीस दलात भरती होण्याचं स्वप्न होतं. त्यासाठीच्या तयारीसाठी तो इंदुरला जाण्यासही तयार होता. त्याच्या वडिलांनी त्याला शिक्षणासाठी इंदूरला पाठवलं. काही दिवसांत त्याची बहिणदेखील शिक्षणासाठी इंदूरला आली आणि ते दोघं एकाच घरात राहून शिक्षण पूर्ण करत होते. (हे पण वाचा : "मी तिला विसरू शकत नाही..."; सुसाईड नोट लिहून पतीनं स्मशानभूमीतच घेतला गळफास)

इंदुरला शिकत असताना राजेशची ओळख कॉलेजमधील एका तरूणीशी झाली. नंतर प्रेम आणि लग्नाची बोलणीही सुरू होती. आपल्या आवडत्या मुलीसोबत लग्न होणार असल्याने राजेश आनंदी होता. पण तरूणीने अचानक राजेशसोबतचा संपर्क तोडला. त्याला भेटणंही ती टाळत होती. यामुळे तो तणावात होता. 

रिपोर्टनुसार, आत्महत्येपूर्वी त्यानं लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये त्याच्या प्रेमप्रकरणाविषयी सविस्तर माहिती दिली आहे. मात्र त्यातील तपशील पोलिसांनी अद्याप जाहीर केला नाही. बुधवारी राजेश आणि त्याची बहिण जेवण करून झोपले होते. बहिणीला सकाळी जाग आली, तेव्हा समोर जे दिसलं ते पाहून बहिणीला धक्का बसला. तिला राजेशचा छताला लटकणारा मृतदेह दिसला.  तिनं तातडीनं पोलिसांना फोन करून याची कल्पना दिली. पोलीस या प्रकऱणी अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेश