शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

आयपीएस पुरुषोत्तम शर्मांना प्रेयसीसोबत पकडले; पत्नीला घरी येऊन मारहाण

By हेमंत बावकर | Updated: September 28, 2020 11:50 IST

पत्नीने प्रेयसीसोबत पकडल्याने भडकलेल्या आयपीएस शर्मा यांनी घरी येत पत्नीवर हल्ला केला. तिचा गळा काखोटीत धरून तिला जमिनीवर पाडले आणि जोरदार ठोसे लगावले.

भोपाळ : स्पेशल डीजी पुरुषोत्तम शर्मा पुन्हा एका मोठ्या वादात सापडले आहेत. आयपीएस पुरुषोत्तम शर्मा यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये ते त्यांच्य़ा पत्नीला बेदम मारहाण करताना दिसत आहेत. धक्कादायक म्हणजे शर्मा यांना प्रेय़सीसोबत त्यांच्या पत्नीने  रंगेहाथ पकडल्याने ही मारहाण केल्य़ाचे कबूल केले आहे. 

पत्नीने प्रेयसीसोबत पकडल्याने भडकलेल्या आयपीएस शर्मा यांनी घरी येत पत्नीवर हल्ला केला. तिचा गळा काखोटीत धरून तिला जमिनीवर पाडले आणि जोरदार हातबुक्के लगावले. शर्मा यांच्या घरात तैनात कर्मचाऱ्यांनी त्यांच्या पत्नीला यातून सोडविले. यवर पुरुषोत्तम शर्मा यांच्या मुलाने त्यांची तक्रार मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे केली असून वडिलांवर कारवाईची मागणी केली आहे. शर्मा यांच्या पत्नीने बचावासाठी त्यांच्यावर कात्रीने वार केले आहेत. 

या कृत्य़ाचा शर्मा यांच्या घरातील कोणीतरी व्हिडीओ काढला असून तो कमालीचा व्हायरल होऊ लागला आहे. या व्हिडीओमध्ये आयपीएस शर्मा हे त्यांचया पत्नीला मारहाण करताना दिसत आहेत. तर पत्नीने बचावासाठी त्यांच्यावर घरातील कैची घेतली आहे. तसेच शर्मा पत्नीला शिव्यांची लाखोली वाहत आहेत. या व्हिडीओत घरातील दोन कर्मचारी ही हाणामारी सोडविण्याच्या प्रय़त्नात दिसत आहेत. 

शर्मा यांच्या मुलाने बापाच्या या कृत्याचा हा व्हिडीओ गृह मंत्री नरोत्तम मिश्रा, डीजीपी आणि अन्य पोलिस अधिकाऱ्यांना पाठविला आहे. मात्र, हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिस अधिकाऱ्य़ांनी यावर प्रतिक्रिया देणे टाळले आहे. तसेच त्यांच्यावर कोणतीही कारवाईही झालेली नाही. मुख्यमंत्र्यांनाही हा व्हिडीओ पाठविण्यात आल्याने या अधिकाऱ्यावर काय कारवाई होते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. 

हनीट्रॅप प्रकरणातही शर्मा अडकलेलेवादात सापडण्याची पुरुषोत्तम शर्मा यांची ही काही पहिलीच वेळ नाही. एसटीएफचे डीजी असतानाही ते खूप चर्चेत असायचे. हनीट्रॅप कांडामध्येही त्यांचे नाव खूप चर्चेत होते. याशिवाय राज्याबाहेरही एसटीएफच्या एका फ्लॅटची चर्चा झाली होती. यावेळी राज्याचे दोन डीजीपी समोरासमोर आले आहे. यानंतर कमलनाथ सरकारने शर्मा यांची उचलबांगडी केली होती. पुरुषोत्तम शर्मा यांचा तक्रारदार मुलगापार्थ गौतम शर्मा हे आयआरएस अधिकारी आहेत. त्यानेच हा व्हिडीओ व्हारल केल्याचे सांगितले जात आहे. मोठा अधिकारी असल्याने पोलीस दलातही कोणी अवाक्षर काढत नाहीय. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिस