शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत मोटार सायकल चोरट्यांना अटक; १६ दुचाकी जप्त 

By नितीन पंडित | Updated: August 22, 2023 18:02 IST

या सर्व आरोपींना भिवंडी न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. 

नितीन पंडित

भिवंडी: शांतीनगर पोलिसांनी चार मोटरसायकल चोरट्यांना अटक केली असून त्यांच्याकडून ५ लाख रुपये किमतीच्या १६ दुचाकी जप्त केल्या असल्याची माहिती भिवंडी सहायक पोलीस आयुक्त किशोर खैरनार यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. मुस्तकीम उर्फ आसीफ मोहमद अमीन अन्सारी वय २५,रा.संजयनगर, भिवंडी,जावेद उर्फ जाहिद जाबीर शेख वय ३९,रा.नविबस्ती,पडघा बोरीवली, हसनैन जाफर हुसेन सैयद वय २१ रा. कौसा मुंब्रा व अतिक उर्फ अल्ताफ मुनाफ शेख वय २३,रा. पिंपळगाव हरेश्वर ता.पाचोरा जि.जळगाव असे दुचाकी चोरी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या चार दुचाकी चोरट्यांची नावे आहेत.       

सुरुवातीला शांतीनगर पोलिसांनी मुस्तकीम यास ताब्यात घेऊन त्याचेकडे तपास केला असता त्याने त्याचे साथीदार जावेद उर्फ जाहिद व हसनैन यांच्या सोबत दुचाकी चोरी करून ते पाचोरा जळगाव येथील अतिक उर्फ अल्ताफ याच्या माध्यमातून जळगाव ग्रामीण भागात विक्री करत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.त्यानंतर पोलिसांनी जळगाव येथून एकूण ११ मोटार सायकल हस्तगत केल्या आहेत.त्यामधून शांतीनगर पोलीस ठाणे येथील ४,कोनगाव पोलीस ठाणे येथील ५,नारपोली पोलीस ठाणे येथील १,पडघा पोलिस ठाणे १ अशा ३ लाख ३५ हजार रुपये किमतीच्या दुचाकी चोरीचे एकूण ११ गुन्हे उघडकीस आणले असून एका दुचाकीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तर मागील आठवड्यात शांतीनगर हद्दीतून मोहम्मद असिफ हबीब शेख ऊर्फ सज्जो वय २०,रा. गायत्री नगर यास ताब्यात घेऊन त्याच्या जवळून १ लाख ६० हजार रुपये किमतीच्या ५ दुचाकी जप्त केल्या आहेत. या सर्व आरोपींना भिवंडी न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.      

हि कामगिरी शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर इंदलकर,पोलीस निरीक्षक निलेश बडाख,विक्रम मोहीते यांच्या नेतृत्वा खाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेंद्र म्हात्रे,पोलिस हवालदार महेश चौधरी, रिजवान सैयद,दिलीप शिंदे,पोलीस नाईक किरण जाधव,श्रीकांत पाटील,पोलिस शिपाई रविंद्र पाटील,नरसिंह क्षीरसागर,तौफीक शिकलगार या तपास पथकाने केली आहे.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसbhiwandiभिवंडी