शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

"आई झोपलीय..."; 5 दिवस लेकाने घरात लपवला मृतदेह, दुर्गंधी येऊ नये म्हणून लावायचा धूप, अगरबत्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 14:35 IST

एका मुलाने आपल्या 82 वर्षांच्या आईचा मृतदेह घरातील बेडखाली तब्बल पाच दिवस ठेवल्याची भयंकर घटना घडली आहे.

उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधून समोर आलेल्या खळबळजनक प्रकरणाने सर्वांनाच धक्का बसला आहे. एका मुलाने आपल्या 82 वर्षांच्या आईचा मृतदेह घरातील बेडखाली तब्बल पाच दिवस ठेवल्याची भयंकर घटना घडली आहे. घरातून दुर्गंधी आल्याने कॉलनीतील लोकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. धक्कादायक घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, गोरखपूरच्या शिवपूर शाहबाजगंज कॉलनीत ही घटना घडली आहे. 

एका 45 वर्षीय मुलाने आपल्या 82 वर्षीय आईचा मृतदेह घरामध्ये लपवून ठेवला होता. दुर्गंधी बाहेर जाऊ नये म्हणून घरात धूप आणि अगरबत्ती लावायचा. काही लोकांना ही वृद्ध महिला  अनेक दिवस दिसली नाही, तेव्हा कॉलनीतील लोकांनी त्याच्या मुलाला विचारले, तेव्हा त्याने सांगितले की, आई झोपली आहे. यानंतर कॉलनीतील लोकांना मृतदेहाचा वास आल्यावर कॉलनीतील त्यांनी लगेचच पोलिसांना याबाबत माहिती दिली. निखिल मिश्रा असं या मुलाचं नाव होतं. 

निखिल मिश्राला सुरुवातीपासूनच ड्रग्जचे व्यसन होते. तो रात्रंदिवस दारूच्या नशेत असायचा. 20 वर्षांपूर्वी त्याचा कुसुमशी विवाह झाला असून त्याला दोन मुलं आहेत. निखिल मिश्राची आई शांती देवी यांचं चार दिवसांपूर्वी निधन झालं होतं, मात्र त्याने  मृतदेह घरात लपवून ठेवला. त्याने त्याच्या आईला अन्न आणि पाणीही दिले नव्हते. कॉलनीतील रहिवाशांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी निखिलच्या आईचं हाड तुटले होते, त्यामुळे ती बेडवरच राहायची. कॉलनीतील लोकांनी जाऊन तिला भाकरी दिली तर ती खायची. 

निखिल मिश्रा इतका मनोरुग्ण होता की त्याने कॉलनीतील रहिवाशांनाही घरात प्रवेश दिला नाही. माहिती मिळताच पोलीस निखिल मिश्राच्या घरी पोहोचले तेव्हा तो पोलिसांना घरातही जाऊ देत नव्हता. कॉलनीतील लोकही काही बोलले तर तो संतापायचा. पोलिसांनी आई कुठे आहे असे विचारले असता मुलाने सांगितले की आई झोपली आहे. मात्र पोलीस आत गेल्यावर पोलिसांना शांतीदेवीचा मृतदेह सापडला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी