शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

आईची क्रूर हत्या, चिमुरड्याचा मृतदेह मगरीच्या जबड्यात; अंगावर शहारे आणणारी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2023 13:19 IST

पशुनचा मृतदेह सापडल्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी डेल होम्स पार्क येथे घरापासून जवळपास १० किमी अंतरावर २ वर्षाच्या टेलेनचा मृतदेह मगरीच्या जबड्यात असल्याचं समोर आले.

एका दुर्दैवी घटनेत पोलिसांना २ वर्षीय चिमुरड्याचा मृतदेह मगरीच्या जबड्यात आढळला. फ्लोरिडाच्या सेंट पीटर्सबर्गचे हे प्रकरण आहे. ज्याठिकाणी गुरुवारी सकाळी सर्वात आधी २० वर्षीय Pashun Jeffery महिलेचा मृतदेह तिच्या अपार्टमेंटमध्ये आढळला. या महिलेची चाकू भोसकून हत्या करण्यात आली होती. याठिकाणाहून बेपत्ता मुलाचा शोध पोलिसांनी सुरू केला. महिलेची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. परंतु तपासात मुलासोबत अधिक भयंकर कृत्य झाल्याचं उघड झाले. 

पशुनचा मृतदेह सापडल्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी डेल होम्स पार्क येथे घरापासून जवळपास १० किमी अंतरावर २ वर्षाच्या टेलेनचा मृतदेह मगरीच्या जबड्यात असल्याचं समोर आले. अधिकाऱ्यांनी मगरीला बेशुद्ध करून मृतदेह ताब्यात घेतला, तो टेलेन असल्याची पुष्टी केली. इतक्या क्रूरपणे टेलेनचा मृतदेह आढळल्याने पोलीसही हैराण झाले. 

वडिलांवर आई-लेकाची हत्या केल्याचा आरोप सध्या या प्रकरणी टेलेनचे वडील २१ वर्षीय थॉमस मोस्ले यांच्यावर फस्ट डिग्री मर्डरचा आरोप करण्यात आला आहे. एनबीसी न्यूजनुसार पोलिसांनी जेव्हा थॉमसचा शोध सुरू केला तेव्हा तो हाताला जखम झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता. 

अत्यंत क्रूरपणे दोघांचा मृत्यूकुटुंबातील लोकांनी बुधवारी संध्याकाळी ५.३० वाजता आई-मुलाला अखेरचं पाहिले होते. त्यानंतर शेजाऱ्यांनी सांगितले की, रात्री ८.३० च्या सुमारास त्यांच्या घरातून मोठमोठ्याने आवाज येत होता. परंतु पोलिसांना बोलावले नाही. या गोंधळात थॉमसच्या हाताला झालेली जखम घेऊन तो बाहेर पडला आणि त्याच्या आईच्या घरी पोहचला. परंतु सकाळी पशुन कॉल उचलत नसल्याने आईने अपार्टमेंटच्या मॅनेजरला फोन केला तेव्हा एका कर्मचाऱ्याने पशुनचा मृतदेह पाहिला. पशुनची हत्या निर्घृणपणे केली होती. सध्या पोलिसांनी या प्रकरणात तपासाला सुरुवात केली असून पशुनची हत्या कधी आणि केव्हा झाली. त्यानंतर टेलेनचा मृतदेह मगरीच्या जबड्यात कसा आला याचा शोध घेत आहे.