पाटणा - बिहारमधील (Bihar) कैमूर जिल्ह्यातील मोहनिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अजब प्रकार घडला आहे. इथे दोन मुलांची आई असलेली एक महिला अल्पवयीन मुलाच्या प्रेमात पडली. मोबाइलवर लागलेल्या राँग नंबरवरून या दोघांमध्ये प्रेमांकूर फुलले. (Love Story) त्यानंतर त्यांच्यात शरीरसंबंधही प्रस्थापित झाले. मात्र या प्रकरणाचा उलगडा झाल्यानंतर आता हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले आहे. (Bihar Crime News)मिळालेल्या माहितीनुसार महिलेने ज्या मुलासोबत प्रेमाचा दावा केला आहे तो दहावीतील विद्यार्थी आहे. तसेच तो सध्या दहावीची परीक्षा देणार होता. या दोघांचीही ओळख एका राँग नंबरवरून झाली. त्यानंतर या मुलाने सदर महिलेला कधी भभुआ तर कधी मोहनिया येथे बोलावून तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले होते. दरम्यान, या घटनेचा उलगडा झाल्यानंतर महिलेच्या कुटुंबीयांनी या दोघांनाही पोलीस ठाण्यात नेले.हा मुलगा कैमूर जिल्ह्यातील कुदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लालापूर गावातील रहिवासी आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सदर मुलगा आणि महिला फोनवरून एकमेकांच्या संपर्कात होते. या मुलग्याने सदर महिलेला अनेकदा भेटण्यासाठी मोहनिया येथे बोलावले होते. तिथे त्यांच्यात तीन-चारवेळा हॉटेलमध्ये शरीरसंबंधही प्रस्थापित झाले होते. ही महिला विवाहित असून, तिला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. दरम्यान, सदर मुलग आणि महिलेमधील संबंधांची माहिती जेव्हा या महिलेच्या सासरच्या लोकांना मिळाली तेव्हा त्यांनी या महिलेला सोबत ठेवण्यास नकार दिला. आता ही महिला अल्पवयीन मुलासोबत राहू इच्छिते. मात्र आता या अल्पवयीन मुलाने या महिलेसोबत राहण्यास नकार दिला आहे. तसेच या महिलेसोबत शरीरसंबंध निर्माण झाल्याचा आरोपही फेटाळला आहे.दरम्यान, सदर महिलेने सांगितले की, चार महिन्यांपूर्वी या मुलाला कुठूनतरी माझा नंबर मिळाला होता, त्यानंतर हा मुलगा मला फोन करू लागला. मी अनेकदा त्याला नकार दिला. मात्र तो सातत्याने मला फोन करायचा. त्यानंतर आमच्यामध्ये बोलणे होऊ लागले. त्यानंतर त्याने मला अनेकदा भभुआ आणि मोहनियामध्ये भेटण्यासाठी बोलावले. त्यादरम्यान आमच्यामध्ये तीन-चारवेळा शरीरसंबंधही निर्माण झाले.मला एक नंबर मिळाला होता. त्यावरून बोलणं होऊ लागलं होतं. मात्र आमच्यात कधीही संबंध निर्माण झाले नाही. हवं तर माझी चौकशी करू शकता. मी तयार आहे, असे या मुलाने म्हटले आहे. दरम्यान आता हा मुलगा सदर महिलेसोबत विवाह करण्यास नकार देत आहे. या दोघांनाही पोलीस ठाण्यात पाठवण्यात आले आहे. आता सदर महिला ज्याप्रकारे तक्रार देईल, त्यानुसार कारवाई होईल, असे मोहनियाचे डीएसपी रघुनाथ सिंह यांनी सांगितले.
राँग नंबरवरून दोन मुलांची आई अल्पवयीनाच्या प्रेमात पडली, लव्हस्टोरीची अशी अखेर झाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2021 15:10 IST