शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

माय-लेकाची विष पिऊन आत्महत्या, डुडुळगावमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 01:32 IST

डुडुळगाव येथे वन विभागाच्या हद्दीत बुधवारी सकाळी दोन मृतदेह आढळून आले.

पिंपरी : डुडुळगाव येथे वन विभागाच्या हद्दीत बुधवारी सकाळी दोन मृतदेह आढळून आले. एक पुरुष, एक महिला असे मृतदेह असल्याने नेमके मृतदेह कोणाचे, त्यांचे दोघांचे नाते काय हे अनभिज्ञ होते. ‘मी आणि माझी आई स्वखुशीने आत्महत्या करीत आहोत, याबद्दल कोणाला दोषी धरू नये’ अशा आशयाची तेथे एक चिठ्ठी आढळून आली. तसेच कीटकनाशक विषारी द्रव्याची बाटली तेथे पडली होती. त्यामुळे मायलेकरांचे मृतदेह असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले असले, तरी त्यांची ओळख पटविणारा दुसरा कोणताही पुरावा आढळून आलेला नाही. या अज्ञात मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी दिघी पोलीस प्रयत्न करीत आहेत.डुडुळगाव येथील वन विभागाच्या हद्दीत झुडपात सडलेल्या अवस्थेतील दोन मृतदेह पडले असल्याची माहिती नागरिकाने पोलिसांना कळविली. दिघी ठाण्याचे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना तेथे कीटकनाशकाची बाटली आढळून आली. दोन्ही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होते. बाजूला चिठ्ठी पडलेली दिसून आली. त्यामुळे चिठ्ठीच्या आधारे त्यांचा नातेसंबंध लक्षात आला. त्यांची ओळख पटेल अशी कोणतीच कागदपत्रे पोलिसांना मिळाली नाहीत. या बाबत तपास सुरू आहे. याबाबत कोणाला माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. दरम्यान, शहर परिसरात आत्महत्येच्या घटनामध्यो मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांमधून चिंता व्यक्त होत आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याCrime Newsगुन्हेगारी