शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

आईनेच आवळला गतिमंद लेकीचा गळा; अंधेरीतील हृदयद्रावक घटना, शुश्रूषेला कंटाळून पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 10:58 IST

लेकीच्या गतिमंदपणाला कंटाळून अंधेरीत एका महिलेने १८ वर्षांच्या मुलीची गळा दाबून हत्या केली.

मुंबई :लेकीच्या गतिमंदपणाला कंटाळून अंधेरीत एका महिलेने १८ वर्षांच्या मुलीची गळा दाबून हत्या केली. एवढ्यावरच न थांबता तिने आत्महत्या केल्याचा बनावही रचला. मात्र शवविच्छेदन अहवालात हा घातपात असल्याचे उघड झाले आणि पोलिसांनी गुरुवारी आईला अटक केली.अंधेरीच्या वीर हनुमान इमारतीत चौथ्या मजल्यावर सुरेश पत्याने हे पत्नी श्रद्धा आणि मुलांसोबत राहतात. पोलीस नियंत्रण कक्षावर १५ जून रोजी एक फोन आला, ज्यात १९ वर्षांच्या तरुणीने गळफास घेत आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार अंधेरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संताजी घोरपडे हे त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी मुलगी चटईवर निपचित पडली होती. तिच्या शेजारी तिचे आई-वडील बसले होते. मृत मुलीचे नाव वैष्णवी असून ती मोठी मुलगी आहे.

तिने कापडी पट्टीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे श्रद्धाने पोलिसांना सांगितले. तिला उपचारासाठी पोलिसांनी जुहूच्या कूपर रुग्णालयात हलविले. तेव्हा डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्याचसोबत तिच्या गळ्यावरील निशाणाबाबत पोलिसांनी कूपरच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली. गतिमंद व्यक्ती अशा प्रकारे गळफास घेऊन आत्महत्या करण्याची शक्यता कमी असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. चौकशीदरम्यान वैष्णवीची आत्महत्या नसून हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आला. तेव्हा त्यांच्याकडून याबाबतची माहिती परिमंडळ १० चे पोलीस उपायुक्त महेश्वर रेड्डी यांना देण्यात आली. 

चौकशीत कापडी पट्टीने गळा आवळल्याची कबुली- रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली घोरपडे व पथकाने वैष्णवीच्या मृत्यूच्या वेळी हजर असलेली एकमेव व्यक्ती म्हणजे तिची आई श्रद्धा हिच्याकडे चौकशी केली. सुरुवातीला तिने काही सांगितले नाही. मात्र नंतर लेकीच्या आजारपणामुळे तिची करावी लागणारी शुश्रूषा याला कंटाळून तिनेच लेकीचा गळा कापडी पट्टीने आवळल्याचे पोलिसांकडे कबूल केले. त्यानुसार तिच्यावर संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करून १६ जूनला तिला अटक करण्यात आल्याची माहिती घोरपडे यांनी दिली. या घटनेमुळे अंधेरी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी