शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

सुनेने केला सासूचा खून, कर्जत तालुक्यातील बेकरे गावातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 01:07 IST

Crime News : सासू झोपेत असल्याचा फायदा घेत सुनेने घरातील वरवंटा सासूच्या डोक्यात घालून सासूला जीवे मारले. बेकरे गावात राहणाऱ्या तारामती कराळे ह्या पहाटे झोपेत होत्या, तर पती पांडुरंग कराळे लवकर उठून गावात गणपती उत्सव असल्याने घराबाहेर पडले होते.

 नेरळ : सासूच्या डोक्यात वरवंटा घालून सुनेने खून केल्याची घटना कर्जत तालुक्यातील बेकरे गावात घडली आहे. तारामती पांडुरंग कराळे (७५) असे या मृत महिलेचे नाव असून, नेरळ पोलिसांनी सुनेला ताब्यात घेतले आहे.सासू झोपेत असल्याचा फायदा घेत सुनेने घरातील वरवंटा सासूच्या डोक्यात घालून सासूला जीवे मारले. बेकरे गावात राहणाऱ्या तारामती कराळे ह्या पहाटे झोपेत होत्या, तर पती पांडुरंग कराळे लवकर उठून गावात गणपती उत्सव असल्याने घराबाहेर पडले होते. पांडुरंग कराळे हे घरी परतल्यावर ६ वाजण्याच्या सुमारास पत्नीला उठवण्यासाठी गेले असता पत्नी उठत नसल्याने घटना उघडकीस आली. तारामती यांच्या डोक्यात जबर मार बसला असून, रक्तस्राव झाल्याने जागीच मृत्यू झाला होता.यावेळी घरात सून योगीता कराळे कुठे दिसून येत नसल्याने शोध घेतला असता सून घराशेजारी असणाऱ्या जागेत लादी पुसण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या द्रव पदार्थ पिलेल्या अवस्थेत मिळून आली. या घटनेबाबत सुनेला नेरळ पोलिसांनी ताब्यात घेतले असून, हत्येमागचे नेमके कारण समजू शकले नसल्याने पोलीस अधिक तपास करीत आहेत.   योगीता हीस मुलगा व मुलगी असून, पती योगेश कराळे यांचा तीन वर्षांपूर्वी मृत्यू झाला. या घटनेने गावामध्ये खळबळ माजली आहे. 

टॅग्स :RaigadरायगडCrime Newsगुन्हेगारी