शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

आईने केली दोन मुलांची हत्या; नंतर स्वत:ही हाताची नस कापून केला आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2022 10:23 IST

घटनेचा रबाळे पोलीस अधिक  तपास करत आहे.

नवी मुंबई : घणसोली गावात राहणाऱ्या एका विवाहितेने आपल्या मुलांची  हत्या करून स्वतःही हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. संबंधित जखमी महिलेवर नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू असून, दोन्ही मृत मुले अल्पवयीन आहेत. या घटनेचे नेमके कारण समजू शकलेले नाही. याप्रकरणी पोलिसांनी मृत मुलांच्या वडिलांना ताब्यात घेतले आहे. घटनेचा रबाळे पोलीस अधिक  तपास करत आहे.

टिपू वेणाराम गुर्जर (वय ४) आणि राहुल वेणाराम गुर्जर (वय १), अशी मृत मुलांची नावे आहेत. तर स्वतःच्या मुलांची हत्या करणाऱ्या आईचे नाव पुष्पा गुर्जर आहे. रबाळे पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार घणसोली गावात रविवारी दुपारी हा प्रकार उघडकीस आला. एका महिलेने स्वतःच्या दोन अल्पवयीन मुलांची हत्या केली आहे. मुलांची हत्या केल्यानंतर आईने स्वतःही हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. 

आठ दिवसांपूर्वी साजरा केला होता वाढदिवस

मृत राहुल गुर्जर या एक वर्षाच्या मुलाचा पहिला वाढदिवस आठ दिवसांपूर्वी साजरा केल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, मृत मुलांचे वडील घणसोली परिसरात आईसक्रीम पार्सलचा व्यवसाय करीत असल्याची माहिती उघडकीस आली आहे. याप्रकरणी वेणाराम गुर्जर याला ताब्यात घेतले असून, रबाळे पोलीस ठाण्याचे गुन्हे निरीक्षक बी. एन. औटी अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCrime Newsगुन्हेगारी