शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

आईनेच केली दीड महिन्याच्या लेकीची हत्या, घरातील पाण्याच्या टाकीत टाकले मुलीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2020 20:10 IST

Murder : वसईच्या पाचूबंदर येथील धक्कादायक घटना

ठळक मुद्देवसई पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलिसांनी आईविरोधात हत्येचा व पुरावा नष्ट केला म्हणून गुन्हा दाखल करून आरोपी आईला अटक केली आहे.

नालासोपारा : वसईच्या पाचूबंदर येथे राहणाऱ्या आईनेच एका दीड महिन्याच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी घडली आहे. तिचा मृतदेह घरात असलेल्या पाण्याच्या टाकीमध्ये सापडला आहे. वसई पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलिसांनी आईविरोधात हत्येचा व पुरावा नष्ट केला म्हणून गुन्हा दाखल करून आरोपी आईला अटक केली आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वसईच्या पाचूबंदर येथे दीड महिन्याच्या मुलीचा बुधवारी दुपारी पावणेबाराच्या सुमारास पाण्याच्या टाकीमध्ये मृतदेह मिळाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. घरातले व आजूबाजूला राहणारे लोक दीड महिन्याची मुलगी सकाळपासून सापडली नसल्याने सर्वत्र शोधाशोध करत होते. काही जण तर तिचे अपहरण झाले असेल असे बोलून पोलिसांना तक्रार करायला घरच्यांना सांगत होते. निर्मला यांची सासू वसई पोलीस ठाण्यात तक्रार करायला आल्यावर एक निनावी फोन आला की तिचा मृतदेह पाण्याच्या टाकीत सापडला आहे. घरातले व वसई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला.

पाचूबंदर येथील किनारा हॉटेलच्या पुढे इतूर परिवार राहतात. या परिवारात सासू, पती, दीर भावजय आणि निर्मला इतूर मुलांसह राहत होते. निर्मला यांचे पती व दीर मासेमारीसाठी बोटीवर जातात. निर्मला यांनी दीड महिन्यांपूर्वी दोन गोंडस जुळ्या मुलींना जन्म दिला होता. त्याच्या दिरालाही मुलीच होत्या. मुलगा झाला नाही म्हणून त्यांना त्रास दिला जायचा. जुळ्या मुली असल्याने एक मुलगी झोपायची तर एक जागी राहायची. शेवटी रोजच्या त्रासाला कंटाळून त्यांनी एका मुलीला बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घरातील पाण्याच्या टाकीत टाकले. टाकीतील पाण्यात बुडून त्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पोलिसांनी जेव्हा आईला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर घडलेली हकीकत सांगितली असल्याचे पोलीस निरीक्षक अनंत पराड यांनी ‘लोकमत’ला सांगितले. 

टॅग्स :MurderखूनVasai Virarवसई विरारPoliceपोलिस