शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

धक्कादायक... अनैतिक प्रेमसंबंधांना विरोध केल्याने आईची केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 11:50 IST

भिवंडीची घटना : प्रेयसीच्या मदतीने मुलाने आवळला गळा

लाेकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : पतीपासून फारकत घेतलेल्या चुलत बहिणीसोबत असलेल्या अनैतिक प्रेमसंबंधांना विराेध केल्याने पाेटच्या मुलाने प्रेयसीच्या मदतीने आईची हत्या केल्याची घटना भिवंडीतील काल्हेर येथे मंगळवारी घडली आहे. अमरावती अंबिकाप्रसाद यादव (वय ५८) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी नारपाेली पाेलिसांनी कृष्णा यादव (वय २९) आणि बबिता यादव (३०) यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे. 

काल्हेर येथील मैत्री कॉम्प्लेक्स येथे अमरावती या पती व दोन मुलांसह राहत होत्या. त्यांच्या घरी पतीला साेडून आलेली पुतणी बबिता राहत हाेती. कृष्णा व बबिता यांच्यात प्रेमसंबंध जुळले. याबाबत अमरावती यांना कळताच त्यांनी हे अनैतिक असल्याचे सांगून त्यास विरोध केला. याचा राग मनात ठेवून कृष्णाने बबिता हिच्या मदतीने जन्मदात्या आईची बेडरूममध्ये पट्ट्याने गळा आवळून हत्या केली. त्यानंतर कृष्णा याने १०० क्रमांकावर फोन करून आईची हत्या झाल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षास दिली. त्यानंतर सहायक पोलीस आयुक्त प्रशांत ढोले, नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथक घटनास्थळी पोहाेचले आणि तपास सुरू केला. चाैकशीत कृष्णा व बबिता यांनीच ही हत्या केल्याचे उघड झाल्याने त्यांना अटक केली. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संभाजी जाधव करीत आहेत.

हाणामारीत मृत्यू झाल्याचा केला बनाव

 पाेलीस तेथे पाेहाेचताच इमारतीच्या गेटजवळ आपला काही मित्रांसोबत वाद हाेऊन हाणामारी झाली. ते पाहताच आईने इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारून मला वाचविण्याचा प्रयत्न केला.  त्याच वेळी माझ्या डाेक्यात जाेरदार प्रहार झाल्याने मी बेशुद्ध झालाे. शुद्धीत आलाे तेव्हा मारहाणीत आईलाही जबर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाला हाेता, असे कृष्णा याने सांगितले.  पोलिसांना संशय आल्याने त्याची कसून चौकशी केली असता बबिता हिच्या मदतीने आपणच आईची हत्या केल्याची कबुली त्याने दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणे