शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 06:21 IST

महिलेचा पती रात्रपाळीवरून सकाळी ९ वाजता घरी परतल्यानंतर ही हृदयद्रावक घटना उघड झाली.

भिवंडी : शहरातील फेणे गाव येथे आपल्या तीन मुलींसह स्वतःही गळफास घेऊन आईने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शनिवारी घडली. संबंधित महिलेचा पती रात्रपाळीवरून सकाळी ९ वाजता घरी परतल्यानंतर ही हृदयद्रावक घटना उघड झाली.

फेणे गाव येथील चाळीत लालजी बनवारीलाला भारती हा यंत्रमाग कामगार पत्नी पुनिता (३२) व मुली नंदिनी (१२), नेहा (७) व अनू (४ वर्षे) यांच्यासोबत राहत होता. लालजी रात्रपाळीसाठी कामावर गेला होता. सकाळी ९ च्या सुमारास तो घरी परतला असता घराचा दरवाजा आतून बंद होता. अनेकदा दरवाजा वाजवूनही पत्नीने दरवाजा न उघडल्याने लालजीने खिडकीतून आत डोकावून पाहिले असता त्याच्या पायाखालची जमीन सरकली. हतबल लालजीने टाहो फोडत दरवाजा उघडला असता छताच्या लोखंडी अँगलवर गळफास घेऊन आत्महत्या केलेले पत्नी व तीन मुलींचे मृतदेह आढळून आले.

आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये !भिवंडी शहर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी स्व. इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. आपण स्वतःच्या मर्जीने आत्महत्या करीत असून, आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये, अशी लिहिलेली चिठ्ठी खोलीत मिळाल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. महिलेने मुलींसह आत्महत्या का व कोणत्या कारणांमुळे केली हे स्पष्ट नसले तरी पोलिस सर्व बाजूने तपास करीत आहेत.

टॅग्स :Deathमृत्यू