शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर १८ जणांकडून ९ दिवस बलात्कार; राज्यात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2021 13:11 IST

आतापर्यंत पोलिसांकडून २० जणांना अटक; ४ अल्पवयीन आणि एका महिलेचा समावेश

कोटा: राजस्थानच्या हाडौतीमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. कोटा जिल्ह्यातल्या सुकेत पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरलं आहे. १५ वर्षीय मुलीवर दीड डझनहून अधिक जणांनी बलात्कार केल्याचा प्रकार समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. नराधमांनी नऊ दिवस मुलीवर अत्याचार केले. या प्रकरणात आतापर्यंत २० जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये ४ अल्पवयीन आणि एका महिलेचा समावेश आहे.नराधम अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत असताना ती विव्हळत होती, जिवाच्या आकांतानं ओरडत होती. त्यावेळी तिला शांत करण्यासाठी नराधम अमली पदार्थ द्यायचे. याशिवाय तिला मारहाण करायचे. मला घरी जाऊ द्या, अशी विनंती पीडित तरुणीनं नराधमांकडे वारंवार केली. त्यावेळी तिला चाकू दाखवून धमकावण्यात आलं.कोटा ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक शरद चौधरींनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकार २५ फेब्रुवारी २०२१ रोजी घडला. 'आरोपी चौथमल, बुलबुल उर्फ पूजा जैन पीडितेला बॅग देण्याच्या बहाण्यानं दुचाकीवरून शेजारच्या झालावाड जिल्ह्यात घेऊन गेले. त्यांनी तिथे तीन-चार मुलांना बोलावलं आणि पीडितेला त्यांच्याकडे सोपवलं. तिला पहिल्या दिवशी गागरोन किल्ल्यावर नेण्यात आलं. त्यानंतर झालावाडमधील एका खोलीत नेलं गेलं. तिथे तिच्यावर अनेकदा अत्याचार करण्यात आले,' अशी माहिती चौधरींनी दिली.६ मार्चला पीडितेची पोलीस ठाण्यात धावपोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, झालावाड, गागरोनमधील अनेक ठिकाणी वेगवेगळ्या आरोपींनी पीडितेवर अत्याचार केले. ५ मार्चला आरोपी महिला बुलबुल उर्फ पूजा जैन अल्पवयीन पीडितेला झालावाडमधल्या सुकेतमध्ये घेऊन आली. पीडितेनं तिच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार तिच्या आईला सांगितला. त्यानंतर ६ मार्चला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.