शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

बंदी असलेल्या माओवाद्यांकडूनच सक्रिय संघटनांना पैशांचा पुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 06:26 IST

बंदी असलेल्या माओवाद्यांकडून सक्रिय संघटनांना पैशांचा पुरवठा होत असल्याचे समोर आले. आयएपीएल (इंडियन असोसिएशन्स पिपल्स लॉयर्स) ही संघटना प्रतिबंधित सीपीआय (एम) च्या पैशावर चालत असल्याची माहिती पोलिसांनी जप्त केलेल्या पुराव्यांद्वारे उजेडात आणली.

पुणे : बंदी असलेल्या माओवाद्यांकडून सक्रिय संघटनांना पैशांचा पुरवठा होत असल्याचे समोर आले. आयएपीएल (इंडियन असोसिएशन्स पिपल्स लॉयर्स) ही संघटना प्रतिबंधित सीपीआय (एम) च्या पैशावर चालत असल्याची माहिती पोलिसांनी जप्त केलेल्या पुराव्यांद्वारे उजेडात आणली. पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये बंदी घातलेल्या सीपीआय (एम) माओवादी संघटनेची आयएपीएल ही सक्रिय संघटना आहे. त्यामुळे एल्गार प्रकरणी जामीनासाठी अर्ज केलेल्यांचा जामीन फेटाळण्याची मागणी जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी केली.कॉम्रेड प्रकाशने शोमा सेन यांना पत्र पाठवून महत्त्वाचे ईमेल डिलीट करण्यास सांगितल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी शुक्रवारी (दि. १०) सुनावणी होणार आहे. जप्त केलेली कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक डाटाच्या आधारे मिळालेल्या माहितीनुसार अटक केलेल्या संशयीत माओवाद्याचा सहभाग उघड झाला आहे. म्हणून त्याचा जामीन नाकारावा अशी मागणी केली. दहशतवादी कारवायांना पैसे पुरविणे, मदत पुरविणे, भरती करणे यामध्ये अटक करण्यात आलेल्या प्रत्येकाचा सहभाग दिसून येत असून त्यांच्या विरोधात सबळ पुरावे आहेत. ते आयएपीएल सारख्या संघटना पुढे करून कार्य करतात. समाजात मानवधिकार कार्यकर्ते आहेत असे भासवून ते माओवाद्यांसाठी काम करत असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे अ‍ॅड. पवार यांनी न्यायालयाला सांगितले.माओवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणावरुन अटक केलेले आणि जामीन मिळावा म्हणून अर्ज दाखल केलेले अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग यांनी त्यांच्यासह अटक केलेल्या इतरांना या प्रकरणात पोलिसांकडून आणि सरकार पक्षाकडून गुन्हेगार अशी प्रतिमा करुन लोकांपुढे मांडले जात असून सुनावणी दरम्यान मीडीया ट्रायल केला जात असल्याचा आरोप अ‍ॅड. गडलिंग यांनी न्यायालयात केला.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीPuneपुणे