शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

प्रफुल्ल पटेलांच्या नावे केली पैशांची मागणी; व्यावसायिकाला ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2024 08:09 IST

प्रफुल्ल पटेल यांच्या नावे थेट कतारच्या राजाशी संपर्क साधत पैशांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : व्यवसायातील तोटा तसेच आई कर्करोगाने त्रस्त असल्याने एका व्यावसायिकाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या नावे थेट कतारच्या राजाशी संपर्क साधत पैशांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार महाराष्ट्र सायबर विभागाच्या कारवाईतून समोर आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी राहुल कांत या व्यावसायिकाला अटक केली आहे. 

वांद्रे येथील रहिवासी असलेल्या राहुलचे जुहूमध्ये हॉटेल होते. हॉटेलमध्ये नुकसान झाले. त्यात आईही कर्करोगाच्या आजाराने त्रस्त होती. दोन महिन्यापूर्वीच बहिणीचे लग्न पार पडले. त्यातही हातातील सर्व पैसे खर्च झाले. यातूनच राहुलने पटेल यांच्या मोबाइल क्रमांकाशी साधर्म्य असलेला क्रमांक मिळवला. त्याद्वारे व्हॉट्सॲप सुरू केले. पटेल यांचा फोटो व्हॉट्सॲपवर डीपी म्हणून ठेवला तसेच ट्रू कॉलरवर प्रफुल्ल पटेल, असे नाव दिसेल अशी व्यवस्था केली. त्यानंतर त्याने एका ऑनलाइन पोर्टलद्वारे देश-विदेशातील महत्त्वाच्या व्यक्तींचे सचिव, सल्लागारांचे संपर्क क्रमांक मिळवले. 

सायबर पोलिसांचा तपास सुरूराहुलने कतारच्या राजपुत्राच्या सल्लगाराला व्हॉट्सॲपद्वारे मेसेज करत पैशांची मागणी केली. मात्र त्यांना संशय आल्याने त्यांनी थेट पटेल यांच्याकडे याबाबत चौकशी केली. तेव्हा, आपण कुठलाही मेसेज केला नसल्याचे सांगून पटेल यांनी तत्काळ सायबर पोलिसांत तक्रार दिली. सायबर पोलिसांनी मोबाइल क्रमांकाआधारे राहुल याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने पटेल यांच्या नाव आणि फोटोचा वापर करत पैशांची मागणी केल्याचे पोलिसांना सांगितले. त्याने अशाच प्रकारे आणखीन कुणाला संदेश पाठवले आहे का? याबाबत सायबर पोलिस तपास करत आहे.

टॅग्स :Praful Patelप्रफुल्ल पटेल