शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी येथील हितेश मुलचंदानी खून प्रकरणातील सराईत गुन्हेगारांच्या टोळीवर ‘मोका’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 14:41 IST

दोन अल्पवयीन मुलांसह सहा आरोपींचा समावेश

ठळक मुद्देवर्चस्वासाठी प्रयत्न : आर्थिक फायद्यासाठी कृत्य

पिंपरी : खून, सरकारी नोकरास मारहाण, गर्दी-मारामारी, गंभीर दुखापत, जबरी चोरी, दरोड्याचा प्रयत्न, खंडणी असे विविध स्वरुपातील गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगाराच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ (मोका) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. टोळीतील सहा आरोपींविरोधात ही कारवाई झाली. यात दोन अल्पवयीन आरोपींचा समावेश आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहबाज सिराज कुरेशी (वय २२, रा. कासारवाडी) असे मोका लावण्यात आलेल्या टोळीच्या प्रमुखाचे नाव आहे. अक्षय ऊर्फ  लिंगा संजय भोसले (वय २५, रा. जुनी सांगवी), योगेश ऊर्फ  लंगडा विठ्ठल टोम्पे (वय २०, रा. पिंपळे गुरव), अरबाज मुन्ना शेख (वय २०, रा. खडकी) यांच्यासह दोन अल्पवयीन आरोपी असे एकूण सहा आरोपींचा या टोळीत समावेश असून त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. शाहबाज सिराज कुरेशी, याच्यावर खून, गंभीर दुखापत, सरकारी नोकरास मारहाण, गर्दी-मारामारी, जबरी चोरी, दरोड्याचा प्रयत्न, खंडणी असे १५ गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच त्याच्या टोळीतील साथीदार अक्षय ऊर्फ  लिंगा संजय भोसले याच्यावर खून, दरोड्याची तयारी करणे, घरफोडी, चोरी, वाहनचोरी, जबरी चोरी यासारखे १२ गंभीर गुन्हे दाखल आहेत. योगेश ऊर्फ  लंगडा विठ्ठल टोम्पे याच्यावर खून, वाहनचोरी यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. अरबाज मुन्ना शेख याच्यावर खून, गर्दी, मारामारी यासारखे दोन गुन्हे दाखल आहेत. दोन अल्पवयीन आरोपींवरही जबरी चोरी, चोरी यासारखे दोन गुन्हे दाखल आहेत.आरोपींविरोधात दाखल गुन्ह्यांचे अवलोकन होऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर बाबर यांनी परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांच्या मार्फ त मोकाअंतर्गत कारवाईचा प्रस्ताव अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांच्याकडे पाठिविला होता. त्यानुसार पोकळे यांनी आदेश पारीत केलेले आहेत. सदर प्रस्ताव त्रुटीविरहित तसेच परिपूर्णरित्या सादर करण्याची कामगिरी पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, स्मिात पाटील, सहायक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, शंकर बाबर, पोलीस हवालदार सचिन चव्हाण यांनी कामगिरी केली..........वर्चस्वासाठी प्रयत्न : आर्थिक फायद्यासाठी कृत्यआरोपी शाहबाज कुरेशी याच्यासह त्याच्या टोळीतील आरोपींनी पिंपरी येथे रोहित किशोर सुखेजा (वय २६, रा. पिंपरी) यांच्या हॉटेलमधून बिअर खरेदी करून हॉटेल समोर लघुशंका केली. त्या वेळी हॉटेलमधील कामगारांनी त्यांना हटकले असता त्यांना मारहाण केली. त्या वेळी हितेश गोवर्धन मुलचंदानी हा तरुण भांडण सोडविण्यासाठी आला.आरोपींनी त्याला एका वाहनात जबरदस्तीने बसवून मारहाण करून धारदार हत्याराने वार करून त्याचा खून केला. त्यानंतर हितेश याचा मृतदेह महापालिकेच्या मागे रस्त्यावर टाकून दिला. वर्चस्वासाठी व त्यातून मिळणाºया आर्थिक फायद्यासाठी गुन्हेगारी टोळी बनवून शाहबाज कुरेशी व त्याच्या साथीदारांनी हा गुन्हा केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCourtन्यायालयPoliceपोलिसMurderखून