शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबाच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
3
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
4
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
5
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
6
Mumbai Local Fight : मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
7
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
8
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
9
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं
10
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
11
पैसे कुठे खर्च होतात कळत नाही? 'या' ५ ॲप्समुळे खर्च ट्रॅक करणे होईल सोपे, आता तुम्हीही व्हा बजेट एक्सपर्ट!
12
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ३ दिवसांत ४ हजारांनी घसरली चांदीची किंमत; पाहा लेटेस्ट रेट
13
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
14
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
15
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
16
पोरी हुश्शार! एकत्र बालपण अन् आता एकत्र झाल्या IAS; शिक्षकाच्या लेकींनी रचला इतिहास
17
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
18
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
19
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
20
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US

मोबाइलचोरास नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 01:54 IST

आरोपी किरण विरम याच्याविरुद्ध चोरीचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून त्याला याप्रकरणात अटक केली आहे.

ठाणे : रिक्षात बसून मोबाइलवरील गाणी ऐकत असलेल्या बिरमल शिंदे (३४, रा. मुलुंड, मुंबई) या रिक्षाचालकाच्या हातातील मोबाइल जबरीने हिसकावून पळणाऱ्या किरण कालीदास विरम (२२, रा. भिमनगर, ठाणे) याला काही दक्ष नागरिकांनी पकडून चांगलाच चोप दिल्याची घटना रविवारी दुपारी घडली. त्याला नौपाडा पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याच्याकडून चोरीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे.नौपाडा येथील भक्ती मंदिर रोडवर १९ जानेवारी रोजी दुपारी २.४५ वाजण्याच्या सुमारास शिंदे हे रिक्षा चालक आपल्याच रिक्षामध्ये मागील सिटवर बसून प्रवाशांची वाट पाहात होते. त्याचवेळी एका मोटारसायकलीवरून तिथे आलेल्या किरण विरम हा त्याचा साथीदार विजय याच्यासह तिथे आला. या दोघांपैकी मागे बसलेल्या किरण याने त्याचा मोबाइल जबरीने हिसकावण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येताच शिंदे यांनी त्याचा काही अंतर पाठलागही केला. मात्र, आरडाओरडा झाल्याने किरणचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्याचवेळी पाठलाग करणाºया शिंदे यांनी मोठ्या धाडसाने त्याला स्कूटरवरून खाली खेचल्यामुळे तो खाली पडला.दरम्यान, तिथे जमलेल्या नागरिकांनी त्याला पकडून चांगलाच प्रसाद दिला. नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे आणि मोहिनी कपिले यांच्या पथकाने त्याला रविवारी अटक केली आहे. आरोपी किरण विरम याच्याविरुद्ध चोरीचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून त्याला याप्रकरणात अटक केली आहे. त्याच्या अन्य एका साथीदाराचा शोध घेण्यात येत असून त्याने आणखीही अशा प्रकारे जबरी चोरीचे गुन्हे केले आहेत का, याचा तपास करण्यात येत असल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणे