शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

जमावाने हार चोरट्यांसोबत साध्या वेशातील पोलिसांनाही केली मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 01:29 IST

हळदीचा समारंभ आटोपून दुचाकीवरून जाणा-या दाम्पत्याचा भिवंडी-ठाणे बायपास मार्गावर पाठलाग करुन मागे बसलेल्या पत्नीच्या गळ््यातील हार मागून येणा-या दुचाकीस्वारांनी हिसकावून घेतला.

भिवंडी - हळदीचा समारंभ आटोपून दुचाकीवरून जाणा-या दाम्पत्याचा भिवंडी-ठाणे बायपास मार्गावर पाठलाग करुन मागे बसलेल्या पत्नीच्या गळ््यातील हार मागून येणा-या दुचाकीस्वारांनी हिसकावून घेतला. मात्र त्या चोरांना माणकोली नाक्यावर पकडून नागरिकांनी मारहाण केली. ही मारहाण सुरु असताना खाजगी मोटारीमधून आलेल्या साध्या वेशातील पोलिसांनी हस्तक्षेप करताच जमावाने त्यांनाही मारहाण केली. नारपोली पोलीस घटनास्थळी पोहोचले व त्यांनी दागिने चोरणा-या चोरांसह पोलिसांवर हात उगारणा-या सहा जणांना अटक केली आहे.भरोडी गावातील सुवर्णा प्रदीप भगत या पती सोबत टेमघर येथून हळदीचा समारंभ आटोपून भिवंडी-ठाणे बायपास रस्त्यावरून बुधवारी रात्री घरी जात होत्या. दरम्यान पाठीमागून दुचाकी वरून आलेल्या युवकाने सुवर्णा हिच्या गळ््यातील हार हिसकावून पळ काढला. सुवर्णा यांनी आरडाओरड केली असता माणकोली नाक्यावर उभ्या असलेल्या टेम्पो चालकाने चोरांची दुचाकी अडवली. त्यावेळी नाक्यावर असलेल्या जमावाने चोरांना मारहाण करण्यास सुरूवात केली. त्याच वेळी नारपोली पोलीस ठाण्याचे साध्या वेशातील पोलीस कारने घटनास्थळी पोहोचले.तेव्हा परिसरांतील नागरिकांनी मोटारी भोवती गराडा घातला. त्यांना मोटारीमध्ये लोखंडीरॉड, कटावणी, हातोडा आढळून आल्याने जमावाने गैरसमजातून साध्या वेशातील पोलिसांवर हात उगारला व मोटारीवर दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांच्या मोटारीचे नुकसान झाले. ही घटना समजताच नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे व सहा. पोलीस आयुक्त नितीन कौसडीकर हे फौजफाट्यासह घटनास्थळी आले. त्यांनी दागिने चोरणारा निलेश भोईर, पोलिसांवर हात उगारणारे ऋषिकेश जोशी (२१), सूर्याजी दिवेकर (२९), प्रफुल्ल पाटील (२९), परेश पाटील (२९), राहुल पाटील (२४), मनोज भगत (२६) या सहाजणांवर गुन्हा दाखल करून त्यांनाही अटक केली. सर्व आरोपींना भिवंडी कोर्टात हजर केले असता त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी