शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

आमदार कर्डिले, जगताप, राठोड यांचे शस्त्रपरवाने रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 19:40 IST

तडीपारी किंवा इतर प्रतिबंधात्मक कारवाई होण्याची शक्यता आहे. 

ठळक मुद्देआमदार शिवाजी कर्डिले, आ. संग्राम जगताप, अनिल राठोड यांच्यासह सहाजणांचे शस्त्र परवाने रद्द करण्याचा आदेश काल जिल्हाधिकाऱ्यांनी काढला. अंतिम निर्णय घेऊन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी गुरूवारी  या सहाजणांचे शस्त्र परवाने रद्द करण्याचा आदेश काढला. 

अहमदनगर - विविध प्रकारचे गुन्हे दाखल असल्याने आमदार शिवाजी कर्डिले, आ. संग्राम जगताप, अनिल राठोड यांच्यासह सहाजणांचे शस्त्र परवाने रद्द करण्याचा आदेश काल जिल्हाधिकाऱ्यांनी काढला. 

विविध गंभीर गुन्हे दाखल असतील तर अशा व्यक्तींचे शस्त्र परवाने रद्द करण्याची कारवाई कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांकडून केली जाते. त्याच अनुषंगाने भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले, राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप, शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड, राष्ट्रवादीचे दादाभाऊ कळमकर, शिवसेनेचे माजी नगरसेवक दिलीप सातपुते, माजी नगरसेवक सचिन जाधव या सहाजणांचे शस्त्र परवाने रद्द करून शस्त्रे जमा करावीत, असा प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे आला होता. 

केडगाव येथे वर्षभरापूर्वी झालेल्या शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडात आमदार कर्डिले, जगताप यांच्यावर गुन्हा दाखल झाला. या घटनेनंतर केडगाव येथे दगडफेक केल्याच्या कारणावरून अनिल राठोड, दिलीप सातपुते, सचिन जाधव यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. पोलीस अधीक्षक कार्यालयावरील हल्लाप्रकरणी दादाभाऊ कळमकर आरोपी होते. याशिवाय या सर्वांवर आणखीही काही गुन्हे दाखल असल्याने प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून या सर्वांचे शस्त्र परवाने रद्द करण्याचा प्रस्ताव पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता. त्यावर अंतिम निर्णय घेऊन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी गुरूवारी  या सहाजणांचे शस्त्र परवाने रद्द करण्याचा आदेश काढला. 

नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीच्या कालावधीत जिल्हा प्रशासनाने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या शहरातील सुमारे साडेपाचशे व्यक्तींवर हद्दपारीची कारवाई केली होती. आताही लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सुमारे पाच हजार उपद्रवी व्यक्तींची यादी पोलिसांनी तयार  केली आहे. त्यांच्यावर तडीपारी किंवा इतर प्रतिबंधात्मक कारवाई होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Murderखूनcollectorजिल्हाधिकारी