शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ तरुणीचे ‘मिसिंग’ पोलिसांकडून दुर्लक्षित?, प्रेमात हत्या, आत्महत्या प्रकरण 

By सूर्यकांत वाघमारे | Updated: January 19, 2024 13:03 IST

कळंबोली येथून बेपत्ता असलेल्या वैष्णवी बाबर (१९) हिच्या तपासाबाबत देखील स्थानिक पोलिसांकडून काहीसे असेच झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.

नवी मुंबई : प्रेयसीची हत्या करून तरुणाने आत्महत्या केल्याच्या प्रकरणात तपासात स्थानिक पोलिसांवर अपयशाचा ठपका बसला आहे. तरुणीची मिसिंग दाखल झाल्यानंतर जर कळंबोली पोलिसांकडून गांभीर्याने तपास झाला असता, तर वेळीच गुन्हा उघडकीस आला असता. परंतु २० दिवसांनी तपास गुन्हे शाखेकडे सोपवल्यानंतर केवळ सीसीटीव्हीच्या आधारे हाती लागलेल्या माहितीवरून त्यांनी गुन्हा उघडकीस आणला.

बेपत्ता तरुण, तरुणींच्या तपासात स्थानिक पोलिस चालढकल करत असल्याचे किंवा अपयशी ठरत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. तरुण, तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार आल्यानंतर अनेकदा प्रकरण हलक्यात घेतले जाते. ते इच्छेने कुठेतरी पळून गेले असावेत, असा अंदाज लावत केवळ मोबाइलद्वारे तपासावर भर दिला जातो. त्यानंतर काही दिवसांनी पुढील तपास गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडे सोपवला जातो.

कळंबोली येथून बेपत्ता असलेल्या वैष्णवी बाबर (१९) हिच्या तपासाबाबत देखील स्थानिक पोलिसांकडून काहीसे असेच झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. १२ डिसेंबरपासून ते ६ जानेवारीपर्यंत कळंबोली पोलिसांना तिच्या तपासात काहीच धागेदोरे हाती न लागल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. मात्र गुन्हे शाखेकडे तपास वर्ग होताच सहायक निरीक्षक नीलम पवार यांनी थेट वैष्णवी शिकत असलेले सायन येथील कॉलेज गाठले. 

...तर सहज उलगडा झाला असता    त्यांच्या पथकाने १२ डिसेंबरचे सीसीटीव्ही तपासले असता ती तरुणासोबत जाताना दिसून आली.     यामुळे दोघेही गेलेल्या मार्गाचा आढावा घेतला असता, खारघर स्थानकात व पुढे टेकडीकडे जाणाऱ्या मार्गावर दोघे सीसीटीव्हीत दिसून आले.     जर कळंबोली पोलिसांकडून सीसीटीव्ही तपासले असते तर इथपर्यंतचा उलगडा सहज झाला असता.     प्रत्यक्षात मात्र त्यांचे हात तपासात तोकडे पडल्याने गुन्हा उघड होण्यास महिन्याचा कालावधी लागला.     वैष्णवीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळाल्याने कुटुंबीयांना अंतिम मुखदर्शन घेता आले नाही. 

मोबाइलचे गूढ कायमगुन्हे शाखा पोलिस सीसीटीव्हीद्वारे टेकडीपर्यंत पोहचले असता, पुढील तपासासाठीदेखील सहायक निरीक्षक नीलम पवार यांच्या पथकाने कसोटीचे प्रयत्न केले. त्यामध्ये सांकेतिक अंकाचा उलगडा करून अखेर पाचव्या दिवशी मृतदेह शोधून काढला. दरम्यान, वैभव बुरुंगले (२४) याने जुईनगर रेल्वेस्थानकालगत आत्महत्या केल्यानंतर काही दिवसांनी मोबाइल आढळून आल्याचे वाशी रेल्वे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र मोबाइल मिळाल्यानंतर तो न तपासता जप्तीत ठेवला होता. तर वैष्णवीचा मोबाइल अद्याप मिळाला नसल्याने त्याबाबतचे गूढ कायम आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी