शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
2
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
3
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
4
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
5
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
6
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
7
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणूकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
8
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
9
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
10
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
11
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
12
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
13
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
14
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
15
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
16
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
17
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
18
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
19
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
20
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती

मीरा रोडमध्ये सनातन यात्रेवर हल्ला; ध्वज फाडले, वाहने फोडली; परिसरात तणावाची परिस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 09:11 IST

मिळालेल्या माहितीनुसार, दोन जातीयवादी गट समोरासमोर आले. वाढता तणाव पाहून पोलिसांनी घटनास्थळ गाठून प्रकरण शांत केले.

Ram Mandir, Mira Road Violence: अयोध्येतील राम मंदिर सोहळ्याबाबत देशभरात आणि परदेशात जोरदार चर्चा सुरू आहे. अनेक ठिकाणी सनातन धर्म यात्रा काढण्यात आल्या. तशातच ठाण्यातील मीरा-भाईंदरमध्ये काढण्यात आलेल्या सनाटक धर्म यात्रेदरम्यान गोंधळ झाल्याची घटना घडली. वाहनांतून राम आणि हनुमानाचे झेंडे घेऊन जाणारे लोक जय श्री रामच्या घोषणा देत होते. यात्रेदरम्यान काही लोकांनी लाठ्या-काठ्या घेऊन वाहनांवर हल्ला केल्याचा आरोप आहे. त्यांनी काही ध्वज फाडल्याचा आरोप आहे. वाहनांची तोडफोड केल्याचेही आरोप केले जात आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन जातीयवादी गट समोरासमोर आले. वाढता तणाव पाहून पोलिसांनी घटनास्थळ गाठून प्रकरण शांत केले. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मीरा रोडवर घडलेल्या या घटनेबाबत सोशल मीडियावर लोकांनी हल्लेखोरांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी होत आहे. अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये संतप्त जमावाने यात्रेत सहभागी महिलांवरही हल्ला केल्याचा आणि त्यांना शिवीगाळ, मारहाण करून जखमी केल्याचा दावा केला जात आहे.

सनातन यात्रा काढणाऱ्या लोकांनी केलेल्या आरोपानुसार, ते ध्वज घेऊन शांततेने जात होते. मीरा-भाईंदरमधून जात असताना अचानक यात्रेत निघालेल्या वाहनांसमोर काही विशिष्ट समाजाचे लोक उभे राहिले. त्यांनी वाहनांवर हल्ला केला. वाहनांवरील ध्वज हिसकावून फाडण्यात आले. मिळालेल्या माहितीच्या आधारे, २१ जानेवारीच्या मध्यरात्री १२ नंतर ही घटना घडली.

पोलिसांनी दिली माहिती

काल रात्री ११ च्या सुमारास मुंबईला लागून असलेल्या मीरा रोडच्या नया नगर भागात हिंदू समाजातील काही लोक ३-४ वाहनांमधून घोषणाबाजी करत होते. यानंतर त्यांचा इतर समाजातील काही लोकांशी वाद सुरू झाला. बिघडलेली परिस्थिती पाहून पोलिसांचे वाहन तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि काही लोकांना ताब्यात घेतले. परिस्थिती नियंत्रणात आली असून परिसरात फ्लॅग मार्च काढण्यात आला आहे. याप्रकरणी नयानगर पोलिसांनी ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.-जयंत बजबळे, डीसीपी

चिघळलेली परिस्थिती पाहून मुंबई पोलिसांचे जवान वाहनांतून घटनास्थळी पोहोचले. या घटनेनंतर अनेकांना ताब्यात घेण्यात आले आहे. आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले. मीरा रोड पोलिसांनी फ्लॅग मार्च काढल्याचे पोलिसांनी सांगितले. लोकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लोकांनी अफवांवर लक्ष देऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

ज्या भागात ही घटना घडली तो मुस्लीमबहुल परिसर असल्याचे पोलिसांनी सांगितले. या परिसराला लागून असलेल्या भागात गुजराती, मारवाडी आणि जैन समाजाचे लोक मोठ्या संख्येने राहतात. या समाजातील लोकच सनातन यात्रा काढत होते. त्यावेळी हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरthaneठाणेMira Bhayanderमीरा-भाईंदरSanatan Sansthaसनातन संस्थाMuslimमुस्लीम