शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलींना करतात अश्लील नृत्यासाठी सक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 07:11 IST

Crime News : मजूर कुटुंबांमधील, वडीलधाऱ्या व्यक्तीचा आधार नसलेल्या कुटुंबातील मुलींना हेरले जाते. सिनेमात काम करण्याची संधी मिळेल, पैसा मिळेल, अशी स्वप्ने दाखविली जातात.

- मनोज ताजने

गडचिरोली : गोरगरीब कुटुंबातील अल्पवयीन मुलींना हेरायचे, त्यांना ग्लॅमरस दुनियेचे स्वप्न दाखवून भुरळ घालायची आणि थेट उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात नेऊन त्यांच्याकडून अश्लील नृत्यासारखे प्रकार करवून घ्यायचे, असा धंदा काही लोकांकडून सुरू आहे. त्याला गडचिरोली जिल्ह्यातील काही मुली बळी पडल्या आहेत. 

मजूर कुटुंबांमधील, वडीलधाऱ्या व्यक्तीचा आधार नसलेल्या कुटुंबातील मुलींना हेरले जाते. सिनेमात काम करण्याची संधी मिळेल, पैसा मिळेल, अशी स्वप्ने दाखविली जातात. मुलगी नाव कमावेल, पैसाही मिळेल म्हणून कुटुंबातील लोक तयार होतात. सुरुवातीला कुटुंबीयांच्या बँक खात्यावर पैसे टाकले जातात. त्यामुळे मुलगी मजेत आहे असा  कुटुंबीयांचा समज होतो; पण नंतर तिच्याकडून हवे ते करवून घेतले जाते. आरमोरी शहराजवळच्या गावातील एक मुलगी अशीच सध्या उत्तर प्रदेशात अडकून पडली आहे. असहाय आई तिला ‘त्या’ लोकांच्या तावडीतून कसे सोडवून आणायचे  या विवंचनेत आहे.

ही पीडित अल्पवयीन मुलगी चंद्रपूर जिल्ह्यात एका व्यक्तीकडे नृत्य शिकण्यासाठी गेली होती. तिच्याबद्दल माहिती घेऊन उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीने तिच्या आईशी संपर्क केला. तुझी मुलगी चांगली डान्सर आहे, तिकडे सिनेमात काम मिळवून देतो, असे आमिष देत सोबत नेले. काही दिवस आईच्या बँक खात्यावर पैसेही टाकले. आता मुलीचा संपर्कही बंद केला आहे. 

बदनामीच्या भीतीपोटी तक्रारच नाही पूर्व विदर्भात दिवाळी ते होळीयादरम्यान ‘मंडई’ उत्सवात ‘डान्स हंगामा’, ‘छत्तीसगडी धमाका’ अशा नावांनी तिकीट लावून नृत्याचे कार्यक्रम होतात. त्यात तोकड्या कपड्यातील मुलींकडून अश्लील नृत्य करवून घेतले जाते.  उत्तर प्रदेश-मध्य प्रदेशातही अशा कार्यक्रमांसाठी मुलींना फूस लावून नेले जाते.

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीCrime Newsगुन्हेगारी