शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर दुकानदाराकडून लैंगिक अत्याचार, तरुणाला अटक

By गौरी टेंबकर | Updated: June 11, 2024 11:38 IST

आरोपी हा स्थानिक दुकानात काम करत असून त्याच परिसरात राहतो असे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

मुंबई : पाच वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी २२ वर्षीय तरुणाला सोमवारी ओशिवरा पोलिसांकडून अटक करण्यात आली. आरोपी हा स्थानिक दुकानात काम करत असून त्याच परिसरात राहतो असे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी तिच्या कुटुंबासह राहते. ती ७ जून रोजी दुपारी काही खरेदी करण्यासाठी दुकानात गेली होती. तेव्हा आरोपीने तिला दुकानात नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. नंतर मुलीने घरी गेल्यावर तिच्या आईला तिच्या गुप्तांगात वेदना होत असल्याचे सांगितले. 

दरम्यान  रविवारी, जेव्हा आई आणि मूलगी आरोपी ज्या दुकानात काम करतो त्या दुकानाजवळून जात असताना, मुलीने तिच्या आईला सांगितले की तिथे काम करणाऱ्या माणसाने तिच्यासोबत सदर प्रकार केला. ज्याने मुलीच्या आईला कथितपणे त्याच्या गुन्ह्याची कबुली दिली मात्र नंतर तो पळून जाण्यात यशस्वी झाला. महिलेने तिच्या पतीसह याप्रकरणी पोलिसात जाऊन तक्रार दाखल केली. 

पोलीस आरोपीचा शोध घेत असतानाच स्थानिक नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६,३७६(३),३७६(ए) ३७६(बी) तसेच पोक्सो कायद्याच्या कलम ६ आणि १९ अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी