शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

गरबा खेळून घरी परताना अल्पवयीन मुलीवर बलात्कार; ओळख लपविण्यासाठी आरोपाने कापले केस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2018 21:30 IST

घटनेच्या वेळी आरोपीने अमली पदार्थाचे सेवन केले होते अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. पीडित मुलीने दिलेल्या या माहितीच्या आधारे पोलिसांनी बुधवारी आरोपीला अटक केली.

मुंबई -  गरबा खेळून घरी परतणाऱ्या एका ११ वर्षाच्या मुलीवर टेम्पो चालकाने बलात्कार केल्याची अतिशय धक्कादायक घटना साकीनाका परिसरात घडली आहे. पीडित मुलगी आणि तिचा मित्र दोघे गरबा खेळून झाल्यानंतर घराच्या दिशेने येत असताना मंगळवारी रात्री ही लज्जास्पद घटना घडली. पोलीस आपला शोध घेत असल्याचे समजल्यानंतर आरोपी सिराज मेहंदी हसन खान (वय ३०) याने अटक टाळण्यासाठी त्याचे फॅशनेबल केसही कापले. मात्र, पोलिसांनी २४ तासांच्या आत आरोपीला त्याच्या साकीनाका येथील घरातून अटक केली. पोलिसांनी आरोपीचा मोबाइल फोन जप्त केला आहे. गुन्हा करण्यापूर्वी त्याने अल्पवयीन मुलीचे काही फोटो काढले होते.

पीडित मुलगी आणि तिचा मित्र त्यांच्या घरापासून काही अंतरावर गरबा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, तिथे गरबा खेळण्यासाठी गेले होते. पीडित मुलगी सातव्या इयत्तेत आहे. आरोपीकडे पूर्णवेळ नोकरी नव्हती. टेम्पो चालक म्हणून तो अर्धवेळ काम करायचा. घटनेच्या वेळी आरोपीने अमली पदार्थाचे सेवन केले होते अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. पीडित मुलीने दिलेल्या या माहितीच्या आधारे पोलिसांनी बुधवारी आरोपीला अटक केली. पीडित मुलगी आणि तिच्या मित्राने आरोपीचे रेखाचित्र तयार करण्यास पोलिसांना मदत केली. आरोपीने अटक टाळण्यासाठी त्याचे केसही कापले पण आम्ही त्याला अटक केली असे पोलिसांनी सांगितले. आरोपी विरोधात कलम ३७६,३७७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी सिराजसह १६ जणांना ताब्यात घेतले होते. 

50 हून अधिक टेम्पो चालकांच्या चौकशीनंतर लैंगिक शोषण करणाऱ्या नराधमास अटक

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कार