शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यातील अल्पवयीन मुलीवर औरंगाबादमधील दोघांचा बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 18:12 IST

अकोला : अकोल्यातील सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेल्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर औरंगाबाद येथील दोघांनी औरंगाबाद शहरातच बलात्कार केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली.

ठळक मुद्देऔरंगाबादला गेली असता, तिची ओळख औरंगाबादच्या कामगार चौकातील रहिवासी दत्ता चिंचोले सोबत झाली. त्यानंतर दत्ता चिंचोलेने त्याचा मित्र राजू सोबत या मुलीची ओळख करून दिली. या दोघांनी अल्पवयीन मुलीला हे छायाचित्र पाठवून शारीरिक संबंध ठेवण्यास बाध्य केले.

अकोला : अकोल्यातील सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेल्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर औरंगाबाद येथील दोघांनी औरंगाबाद शहरातच बलात्कार केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. या प्रकरणात सिव्हिल लाइन्स पोलिसांनी गुन्हा दाखल करून, प्रकरण औरंगाबाद पोलिसांकडे वर्ग केले आहे.सिव्हिल लाइन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी १७ वर्षीय मुलगी औरंगाबादला गेली असता, तिची ओळख औरंगाबादच्या कामगार चौकातील रहिवासी दत्ता चिंचोले सोबत झाली. त्यानंतर दत्ता चिंचोलेने त्याचा मित्र राजू सोबत या मुलीची ओळख करून दिली. त्यानंतर ओळखीचे मैत्रीत रूपांतर होताच, या दोघांनी तिला औरंगाबाद शहराबाहेर असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर आणले. तिथे अल्पवयीन मुलीसोबत दत्ता व त्याचा मित्र राजू या दोघांनी छायाचित्र काढले. एकमेकांच्या गळ्यात हात टाकून तसेच आक्षेपार्ह छायाचित्र काढल्यानंतर या दोघांनी अल्पवयीन मुलीला हे छायाचित्र पाठवून शारीरिक संबंध ठेवण्यास बाध्य केले. २६ जून ते ७ सप्टेंबर या दोन ते तीन महिन्यांच्या कालावधीत या दोघांनी मुलीचे शारीरिक शोषण सुरूच ठेवले. मात्र, मुलगी अकोल्यात परतल्यानंतरही या दोघांनी तिला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी त्रास दिल्याने या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीने दत्ता चिंचोले व त्याचा मित्र राजू या दोघांविरोधात बलात्कार, विनयभंग, पोक्सो व अ‍ॅट्रॉसिटी कायद्यानुसार सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दिली. यावरून सिव्हिल लाइन्स पोलिसांनी या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर घटनास्थळ व प्रकरण औरंगाबाद शहरात घडल्याने सिव्हिल लाइन्स पोलिसांनी हे प्रकरण औरंगाबाद पोलिसांकडे पाठविले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी