शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकट; KL राहुलनं एक कॅच सोडला
4
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
5
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
6
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
7
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
8
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
9
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
10
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
11
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
12
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
13
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
14
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
15
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
16
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
17
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
18
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
19
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल

हॉटेल कर्मचाऱ्याची हुशारी, कॅब चालकाचा धूर्तपणा; एआय एक्सपर्टने केलेल्या मुलाच्या हत्येतील इनसाईड स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2024 09:44 IST

काल गोवा पोलिसांनी मुलाच्या हत्येच्या आरोपाखाली एका महिलेले ताब्यात घेतले आहे.

काल गोव्यातून एक धक्कादायक घटना समोर आली. एका महिलेने स्वत:च्या चार वर्षाच्या मुलाची हत्या केल्याचे समोर आले. या प्रकरणी पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले आहे. महिलेने हत्या केल्यानंतर मृतदेह सोबत घेऊन जात असताना हे प्रकरण उघडकीस आले. तिने आपल्या मुलाची हत्या केली. मात्र मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची हे समजत नव्हते. महिलेला गोव्याची माहिती नव्हती. मग तिने बंगळुरूला रस्त्याने कॅबने जायचे. कदाचित ती त्याच मार्गावरील एखाद्या निर्जन ठिकाणी मृतदेहाची विल्हेवाट लावेल. पण गोव्यातील  हॉटेलचे कर्मचारी आणि टॅक्सी चालक यांच्या शहाणपणाने तिचे हे प्रकरण उघडकीस आले.

कंपनी सीईओ महिलेने केली पाेटच्या चिमुकल्याची हत्या; कॅबच्या आग्रहाने संशय बळावला

पोलिसांनी दिलेली माहिती अशी,  हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनाच खोलीत रक्ताचे थेंब दिसले. आर्टिफिशियल इंटेलिजेंस एथिक्स तज्ञ सुचना सेठ  फ्लाइटऐवजी कॅबने बेंगळुरूला जाण्याच्या निर्णयाबद्दल हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनाच संशय आला. माहिती मिळाल्यावर ती एका मुलासोबत आली असल्याचे हॉटेलच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले, परंतु चेकआउटच्या वेळी तो मुलगा तिच्यासोबत नव्हता. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनीच सर्वप्रथम स्थानिक पोलिसांना माहिती दिली. ही माहिती मिळताच पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली. 

अल्पावधीतच कर्नाटक पोलिसांच्या सहकार्याने आरोपी आई सुचना हिला गोव्यात ताब्यात घेण्यात आले. हॉटेल कर्मचारी आणि गोवा पोलिसांव्यतिरिक्त, कॅब ड्रायव्हर ज्याने कॅबमध्ये बसून सर्व माहिती गोवा पोलिसांना दिली, त्याचा मार्ग सांगितला. गोवा पोलिसांची गाडी इमांगला पोलिस स्टेशनला नेली. संपूर्ण देशाला हादरवून सोडणारी ही घटना. सुचना सेठ गोव्यातून बंगळुरूला टॅक्सीने निघाली तेव्हा उघडकीस आली. हॉटेलचे कर्मचारी ती तिच्या मुलासह राहत असलेल्या खोलीत पोहोचली. खोलीत रक्ताचे डाग दिसले आणि त्यांनी तत्काळ स्थानिक पोलिसांना माहिती दिली. पोलिसांचे पथक हॉटेलमध्ये पोहोचले. संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली. यानंतर पोलिसांनी सेठसाठी इनोव्हा कार पाठवणाऱ्या हॉटेलच्या ट्रॅव्हल डेस्कवरून ट्रॅव्हल एजन्सीचा नंबर घेतला. आता गाडीच्या चालकाचा क्रमांक गोवा पोलिसांकडे होता. पोलिसांनी त्या चालकाला बोलावले. त्याने फोन डायल करताच गाडीत बसलेल्या मॅडमशी बोलायला सांगितले.

गोवा पोलिसांनी त्या महिलेकडे चौकशी करायला सुरुवात केली. तुमचा मुलगा कुठे आहे याची वियारपूस केली.  तेव्हा  सुचना सेठने निर्भयपणे उत्तर दिले की मी गोव्यात एका नातेवाईकाकडे आहे. काही दिवसांनी परत येईल. गोव्यातील त्याच्या नातेवाईकाचा पत्ताही तिने पोलिसांना दिला. कदाचित ती चुकीची शंका घेत असावी असे पोलिसांना वाटले. तरीही पोलिसांनी माहितीत दिलेल्या पत्त्यावर पोलिसांचे पथक पाठवले. मात्र संपूर्ण परिसरात शोध घेऊनही पत्ता लागला नाही. तिने दिलेला पत्ता खोटा होता. पोलिसांनी तात्काळ पुन्हा त्या गाडीच्या चालकाला बोलावून घेतले, यावेळी  हत्या झालेल्या मुलाचा मृतदेह घेऊन सुचना सेठ कारमध्ये बसली होती. यानंतर पोलिसांसमोर या घटनेचा उलघडा झाला. 

कॅब चालकाने पोलिस ठाणे गाठले 

गोवा पोलिसांनी कॅब चालकाला सांगितले की, तुमच्या जवळ एक पोलिस ठाणे दिसताच लगेच कार तिथे घेऊन जा. यानंतर फोन करा. त्यावेळी कॅब कर्नाटकातील चित्रदुर्ग भागातून जात होती. त्यानंतर चालकाची नजर चित्रदुर्गातील इमंगळा पोलिस ठाण्यावर पडली. त्यांनी तात्काळ गाडी पोलिस ठाण्यात नेली. सुचना सेठला काही समजण्याआधीच चालकाने मंगला पोलीस ठाण्यात उपस्थित असलेल्या पोलिसांना गोवा पोलिसांची माहिती दिली आणि फोन डायल करून त्यांना पोलिसांशी बोलण्यास सांगितले. गोवा पोलिसांनी संपूर्ण घटना इमंगळा पोलिसांना सांगितली आणि माहिती आणि सामानाची तपासणी  घेण्याची विनंती केली.

कर्नाटक पोलिसांनी इनोव्हा कारचा शोध सुरू केला. त्यात एक मोठी बॅग आढळून आली, ती बॅग उघडताच पोलिसांना धक्का बसला. त्यात एका मुलाचा मृतदेह होता. पोलिसांनी तात्काळ सुचना सेठ हिला ताब्यात घेतले. यानंतर गोवा पोलिसांना माहिती देण्यात आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीgoaगोवा