शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
2
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
3
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
4
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
5
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
6
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
7
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
8
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
9
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
10
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
11
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
12
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
13
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
14
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
15
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
16
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
17
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
18
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
19
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
20
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!

एमआयएमचा माजी शहराध्यक्ष जावेद कुरेशीला अटक; इतर १०० जणांविरोधातही गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 7:00 PM

दहशत निर्माण केल्याप्रकरणी बेगमपुरा पोलिसांनी एमआयएम पक्षाचा शहराध्यक्ष जावेद कुरेशीसह १०० ते १५० जणांविरोधात गुन्हा नोंदविला.

औरंगाबाद: घाटी परिसर आणि टाऊन हॉल येथे पोलिसांच्या सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आणि गैरकायद्याची मंडळी जमवून दहशत निर्माण केल्याप्रकरणी बेगमपुरा पोलिसांनी एमआयएम पक्षाचा माजी शहराध्यक्ष जावेद कुरेशीसह १०० ते १५० जणांविरोधात गुन्हा नोंदविला. रात्री उशीरा पोलिसांनी जावेदला अटक करून सिटीचौक ठाण्याच्या लॉकअपमध्ये डांबले. न्यायालयाने त्याला २१पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली.

पोलिसांनी सांगितले की, महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी दुपारी एमआयएम पक्षाचा नगरसेवक सय्यद मतीनला भाजपा  नगरसेवकांनी मारहाण केली. मारहाणीनंतर मतीन घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला. या बाबतची माहिती मिळताच एमआयएमचा माजी शहराध्यक्ष जावेद कुरेशी हा कार्यकर्त्यांसह घाटीत दाखल झाला. त्यावेळी त्याने प्रचंड आरडाओरड करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. 

तेथे कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यास घाटीतून निघून जाण्याचे सांगितले. मात्र त्याने ऐकले नाही.नंतर काही वेळाने तो कार्यकर्त्यांसह टाऊन हॉलकडे गेला. तेथील दुकाने त्याने बळजबरीने बंद कराला लावली. टाऊन हॉल येथे कर्तव्यावरील पोलिसांनाही त्याने जुमानले नाही. त्यांच्या सरकारी कामात अडथळा आणण्याचे काम त्याने केले. याबाबत पोलीस हेड काँन्स्टेबल प्रसन्नजीत सातदिवे यांनी आरोपी जावेदसह १०० ते १५० कार्यकर्त्यांविरोधात तक्रार नोंदविली. जावेदविरोधात गुन्हा नोंद होताच पोलीस अधिकाऱ्यांनी रात्रीच त्याच्या घरातून जावेदला उचलले. नंतर ठाण्यात नेऊन त्याला रितसर अटक केली. त्याला रात्रभर सिटीचौक ठाण्यातील लॉकअपमध्ये ठेवण्यात आले. 

टॅग्स :Arrestअटकgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीAurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीस