शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

असा सीरिअल किलर जो खात होता मृतदेहांचे अवयव, 16 हत्यांसाठी मिळाली होती 15 वेळा जन्मठेपेची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 09:28 IST

Milwaukee Monster Jeffrey Dahmer Story: लोक आजही त्याच्यासाठी 'कसाई' आणि 'राक्षस'सारखे शब्द वापरतात. या नरभक्षीने एकूण 16 लोकांची जीव घेतला होता. त्याची दहशत अमेरिकेतील अनेक प्रांतांमध्ये होती.

Milwaukee Monster Jeffrey Dahmer Story: जगातल्या सगळ्यात खतरनाक सीरीअल किलरांचा विषय निघाला की, सगळ्यात आधी कदाचित जेफरी डामर याचं नाव घेतलं जातं. कारण त्याच्या कृत्यांवर अनेक मालिका आणि सिनेमे बनले आहेत. अमेरिकेच्या मिलवौकी शहरात राहणारा जेफरी डामर किती खतरनाक होता, याचा अंदाज यावरून लावता येऊ शकतो की, लोक आजही त्याच्यासाठी 'कसाई' आणि 'राक्षस'सारखे शब्द वापरतात. या नरभक्षीने एकूण 16 लोकांची जीव घेतला होता. त्याची दहशत अमेरिकेतील अनेक प्रांतांमध्ये होती.

हा गुन्हेगार हत्या केल्यानंतर पीडितांचं मांस खात होता. यामुळेच लोक त्याला मिलवौकीचा 'राक्षस' म्हणत होते. यूएस मीडिया रिपोर्टनुसार, डामर एखाद्याची हत्या करण्याआधी त्याला ड्रग्स देत होता. पोलिसांनुसार, डामरने पहिली हत्या 1978 मध्ये 19 वर्षीय स्टीव हिक्सची केली होती. त्याने त्याला लिफ्ट दिली आणि नंतर घरी घेऊन गेला. त्याला दारू पाजली आणि जेव्हा तो घरी परत जात होता तेव्हा त्याची हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह तो घराच्या बेसमेंटमध्ये घेऊन गेला. त्याचे अनेक तुकडे करून घराच्या अंगणात दफन केले.

डामरने दुसरी हत्या 1980 मध्ये केली. यानंतर 1990 पर्यंत तो नव्या लोकेशनवर म्हणजे आपल्या आजीच्या घरी लोकांना मारत होता. त्याने 16 हत्या केल्या. 1991 मध्ये 17वी शिकार शोधली. ट्रेसी एडवर्ड्सला त्याने आपल्या घरी बोलवलं. खाऊ-पिऊ घातलं. पण तो सतर्क होता. तो बेशुद्ध झाला नाही आणि कसातरी डामरच्या जाळ्यातून पळून पोलिसांकडे गेला. पोलिसांना त्याने सगळं काही सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी या गुन्हेगाराला अटक केली.

डामरचा फ्रिज जेव्हा पोलिसांनी चेक केला तर त्यात जे दिसलं ते पाहून टीममध्ये असलेली एक महिला पोलीस बेशुद्ध झाली होती. कारण डामरने हत्या केल्यानंतर काहींच्या मृतदेहाचे तुकडे  फ्रिजमध्ये ठेवले होते. पोलिसांनी वेगवेगळ्या मृतदेहांचे अनेक तुकडे आणि शीर आढळून आले.कोर्टात हजर केल्यावर जेव्हा त्याचं मेडिकल चेकअप केलं तर तो मानसिक आजारी असल्याचं समोर आलं. त्यानंतर 1992 मध्ये त्याला वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये 15 वेळा जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. पण 1994 मध्ये तुरूंगात क्रिस्टोफर स्कार्वर नावाच्या एका कैद्याने डामरची हत्या केली.

टॅग्स :AmericaअमेरिकाCrime Newsगुन्हेगारी