शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

दुधविक्रेत्यावर चाकुने हल्ला, चार हजार रुपये लुटले

By प्रदीप भाकरे | Updated: March 14, 2024 13:41 IST

रेल्वे स्टेशनसमोरील घटना : सिटी कोतवालीत गुन्हा दाखल

अमरावती: एका दुधविक्रेत्याला थांबवून त्याच्यावर चाकुने वार करण्यात आले. तथा त्याच्याकडील चार हजार रुपये हिसकावण्यात आले. सशस्त्र लुटीची ही घटना १२ मार्च रोजी रात्री ९.४५ च्या सुमारास रेल्वे स्टेशनसमोरील एका बारजवळच्या दुभाजकानजिक घडली. याप्रकरणी, सर्वेश काळपांडे (२९, रा. वडगाव माहुरे) याच्या तक्रारीवरून शहर कोतवाली पोलिसांनी १३ मार्च रोजी पहाटे अज्ञात तीन ते चार जणांविरूध्द खुनाचा प्रयत्न व अन्य कलमांन्वये गुन्हा दाखल केला.

१२ मार्च रोजी रात्री ९.३० च्या सुमारास सर्वेश हा आपल्या दुचाकीने दुध वाटप करण्यासाठी रेल्वे स्टेशन चौकाकडून ईर्विन चौकाकडे जात होता. तेव्हा त्या रस्त्यावरील वाईन शॉप जवळील डिव्हायडरमधून ३ ते ४ अनोळखी इसम रोड क्रॉस करत होते. त्यावेळी सर्वेशच्या दुचाकीचा त्यांना कट लागला. त्यामुळे सर्वेशने दुचाकी थांबविली. तर आरोपींनी एकदमच शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्या अनोळखी चारही इसमानी सर्वेशला खाली ओढले. तथा मारहाण सुरू केली. साले हमको जानता नही क्या, तेरेको खत्म कर देंगे, असे म्हणून चौघांपैकी एकाने सर्वेशच्या पोटावर चाकुने वार केला. मात्र वाचण्यासाठी त्याने उजवा पाय वर केल्याने त्या आरोपीने त्याच्या उजव्या पायाच्या मांडीवर चाकुने दोन ते तीन वार केले. त्यामुळे त्याच्या मांडीतुन रक्त स्त्राव होऊ लागला. त्यावेळी त्यातीलच एका अनोळखी इसमाने सर्वेशच्या पॅन्टच्या खिशातून दुधाच्या विक्रीचे ४ हजार रुपये बळजबरीने काढले. तथा चौघेही तेथून पळून गेले. काही प्रत्यक्षदर्शींनी सर्वेश काळपांडे याला जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी