शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

सासुरवाडीवर मध्यरात्री हल्ला, जावयाकडून तिघांची हत्या; अहमदनगर जिल्हा हादरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2023 09:49 IST

मेहुणा, पत्नी, आजेसासूचा मृत्यू: सासू, सासरे, मेहुणी जखमी, दार वाजवल्यानंतर सुरेशच्या आजेसासू हिराबाई गायकवाड यांनी दरवाजा उघडताच त्यांच्यावर आरोपींनी प्रथम चाकूहल्ला केला

शिर्डी (जि. अहमदनगर) : कौटुंबिक वादातून जावयाने चुलत भावाच्या मदतीने सासुरवाडीवर हल्ला करून मेहुणा, पत्नी व आजेसासूची धारदार शस्त्राने हत्या केली. तर कुटुंबातील तिघे गंभीर जखमी आहेत. बुधवारी मध्यरात्रीच्या या तिहेरी हत्याकांडाने जिल्हा हादरला आहे. दोन्ही आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे.        

पत्नी व सासुरवाडीतील लोकांशी असलेल्या वादाचा राग मनात धरून संगमनेर येथील सुरेश विलास निकम (३२) व त्याचा चुलत भाऊ रोशन कैलास निकम (२४) हे दोघे मोटारसायकलवरून सावळीविहीर येथे सुरेशच्या सासुरवाडीला आले. दार वाजवल्यानंतर सुरेशच्या आजेसासू हिराबाई गायकवाड यांनी दरवाजा उघडताच त्यांच्यावर आरोपींनी प्रथम चाकूहल्ला केला. यानंतर आवाजाने जागे झालेल्या कुटुंबातील अन्य सदस्यांवरही आरोपींनी बेफाम चाकूहल्ला केला. मदतीला आलेल्या शेजाऱ्यांना चाकूचा धाक दाखवून आरोपी पसार झाले.

अन् टोलनाक्यावर सापडले तावडीत आरोपी सुरेश निकम व रोशन निकम हे दुचाकीवरून नाशिकरोडला येऊन रेल्वेने परराज्यात पळून जाणार असल्याची माहिती नाशिकरोड पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास शिंदे टोलनाका येथे सापळा रचला. सिन्नरकडून नाशिकरोडकडे नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवरून दोघे जण येत होते. पोलिसांना बघताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी टोलनाक्याजवळ शिताफीने त्या दोघांना बेड्या ठोकल्या.

या घटनेत आरोपीचा मेहुणा रोहित चांगदेव गायकवाड (२५), पत्नी वर्षा सुरेश निकम (२४) व आजेसासू हिराबाई गायकवाड (७०) यांचा मृत्यू झाला. तर, आरोपीची सासू संगीता चांगदेव गायकवाड (४५), सासरे चांगदेव गायकवाड (५५) व मेहुणी योगिता महेंद्र जाधव (३०) हे गंभीर जखमी झाले. जखमींवर साईबाबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  

चार पथकांकडून शोध  : पोलिस अधीक्षक राकेश ओला व अपर अधीक्षक स्वाती भोर, उपअधिक्षक संदीप मिटके, पोलिस निरीक्षक सोपान शिरसाट तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तातडीने चार पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी