शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विनासोडत म्हाडाचे घर देतो सांगून कोटी रुपये उकळणाऱ्या म्हाडा अधिकाऱ्याला बेड्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2018 19:48 IST

या प्रकरणी खार पोलिसांनी आज टिळक नगर येथील राहत्या घरातून म्हाडात समाज विकास अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या युवराज पाटील सावंतला बेड्या ठोकल्या आहेत. 

मुंबई - म्हाडाचे स्वस्तात घर मिळावे असं अनेकांचं स्वप्न असतं. तसंच स्वप्न होतं योगेश अहिर यांचं देखील. योगेश अहिर यांच्यासह अनेकांना २००९ च्या म्हाडा सोडतीतून विनासोबत विशेष अधिकारी आरक्षणातून म्हाडाचं घर मिळवून देतो असं सांगून म्हाडाचा अधिकारी युवराज पाटील सावंत आणि त्याच्या साथीदारांनी २ कोटी २२ लाख रुपये उकळले होते. या प्रकरणी खार पोलिसांनी आज टिळक नगर येथील राहत्या घरातून म्हाडात समाज विकास अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या युवराज पाटील सावंतला बेड्या ठोकल्या आहेत.

२००९ साली म्हाडाची स्वस्त किंमतीत घरांची सोडत निघाली होती. या सोडतीतील विनासोडत घर मिळवून देतो असं सांगून तक्रारदार योगेश अहिर यांच्यासह अनेकांचे कोटी रुपये विद्याधर उर्फ बबन पाल, सुनीता तुपसौंदर्य, रमेश चव्हाण आणि युवराज सावंत पाटील यांनी संगनमताने लुबाडले होते. त्यानंतर २७ नोव्हेंबर २०१४ साली तक्रारदार योगेश अहिर यांच्यासह अनेकांनी खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर तपासादरम्यान खार पोलिसांनी विद्याधर उर्फ बबन पाल, सुनीता तुपसौंदर्य, रमेश चव्हाण, जितेंद्र गाडिया यांना अटक केली. नंतर या चौघांची जामिनावर मुक्तता झाली. मात्र, तब्बल चार वर्ष म्हाडाचा अधिकारी असलेला युवराज सावंत पाटील मात्र पोलीस तपासात फरार होता. या अधिकाऱ्याची लाचलुचपत प्रतिबंध विभागाद्वारे चौकशी देखील सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान तक्रारदार योगेश अहिर यांनी मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. त्यानंतर तब्बल चार वर्षांनी फरार आरोपी असलेल्या युवराज सावंत - पाटीलला टिळक नगर येथील राहत्या घरातून आज सायंकाळी अटक करण्यात आली असल्याची माहिती खार पोलीस ठाण्याचे संजय मोरे यांनी लोकमतशी बोलताना दिली. उद्या या आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.  

टॅग्स :fraudधोकेबाजीmhadaम्हाडाPoliceपोलिसArrestअटक