शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

म्हाडा बोगस वेबसाइट; आणखी दोघांना अटक, दोघेही उच्चशिक्षित, पोलिस चौकशी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 08:52 IST

डिलाईल रोडचा रहिवासी असलेला ओमकार बीकॉम झाला असून, तो ‘वन टेक’मध्ये ग्राफिक डिझायनर होता.

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाची (म्हाडा) बनावट वेबसाइट प्रकरणात गुन्हे शाखेने आणखी दोघांना अटक केली आहे. ओमकार शिंदे (२६) आणि सत्यम तिवारी (२५), अशी त्यांची नावे असून, दोघेही उच्चशिक्षित आहेत. ते ‘वन टेक मीडिया कंपनी’त वेब डेव्हलपर आणि ग्राफिक डिझायनर म्हणून कार्यरत होते. 

डिलाईल रोडचा रहिवासी असलेला ओमकार बीकॉम झाला असून, तो ‘वन टेक’मध्ये ग्राफिक डिझायनर होता. तर, पालघरचा सत्यम हा वन टेकमध्ये अँड्रॉइड डेव्हलपर म्हणून कार्यरत होता. त्याने बी.टेकच्या दुसऱ्या वर्षात ड्रॉप घेतला आहे. यापूर्वी गुन्हे शाखेने कल्पेश सेवक आणि अमोल पटेल या दोघांना अटक केली. म्हाडाचे हुबेहूब मात्र बनावट संकेतस्थळ तयार करून त्याद्वारे नागरिकांच्या फसवणुकीचा डाव मांडणाऱ्या आरोपींपैकी अमोल पटेल (सावंत) हा शिक्षक असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 म्हाडाचे बनावट संकेतस्थळ बनवणाऱ्या मुख्य आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत. अटक केलेल्या अमोल याच्यावर म्हाडाचा अधिकारी असल्याचे भासवून बनावट संकेतस्थळावर घरासाठी अर्ज करणाऱ्या नागरिकांशी संवाद साधण्याची जबाबदारी होती. तर नागरिकांना फसवून घेतलेली अनामत रक्कम आणि पुढील व्यवहारातून येणारे पैसे स्वीकारण्यासाठी कल्पेश सेवक याच्या बँक खात्याचा वापर होणार होता. या टोळीने म्हाडातील दलालांशी संपर्क साधून लॉटरीद्वारे घर घेणाऱ्या नागरिकांना आपल्यापर्यंत आणण्यास सांगितले होते. 

 बनावट संकेतस्थळावर अर्ज करणाऱ्या नागरिकांशी ही टोळी स्वतः संपर्क साधत होती. या आरोपींच्या सांगण्यावरून ओमकार आणि सत्यमने ही वेबसाईट बनवून दिली होती. याप्रकरणी त्यांच्याकडे अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :mhadaम्हाडाCrime Newsगुन्हेगारी