शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
2
स्कुबा डायव्हिंग करताना ५२ वर्षीय प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का
3
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
4
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
5
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
6
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
7
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
9
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
10
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
11
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
12
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
13
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
14
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
15
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
16
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
17
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
18
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
19
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
20
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

Video : #MeToo : शिवडी टीबी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार;नर्सने केला डॉक्टरवर विनयभंगाचा आरोप

By पूनम अपराज | Updated: November 19, 2018 18:20 IST

याबाबत लेखी तक्रार पीडित नर्सने राज्य महिला आयोगाकडे आणि आर. ए. के. मार्ग पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

ठळक मुद्दे पीडित नर्सने पुढे येऊन अन्यायाला आवाज उठविण्याचे ठरविले पीडित नर्सने पोलीस उपायुक्त अंबिका, आर.ए.के. मार्ग पोलीस ठाण्यात आणि राज्य महिला आयोगाकडे तक्रार अर्ज दाखल केला शिवडी टीबी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. ललित आनंदे यांना विचारले असता, डॉ. अमर पवार हे अतिशय कर्तव्यदक्ष डॉक्टर असून, रुग्णालयातील भांडणाचे पर्यावसान हे या विनयभंगाच्या पोलीस तक्रारीत होत असल्याचे म्हणाले

मुंबई - जगभरात सुरू असलेल्या MeTooच्या वादळामुळे शिवडीतील टीबी रुग्णालयात घडलेली धक्कादायक घटना आता पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचली आहे. पीडित महिलेसोबत ही घटना १० ऑगस्ट २०१८ ला घडली होती. त्यानंतर होणारी बदनामी आणि संसारात निर्माण होणार कलह लक्षात घेऊन पीडित नर्सने आवाज उठवला नव्हता. मात्र, संपूर्ण देशभरात MeTooचे वादळ उठल्यानंतर हिंमत करून  नवऱ्याच्या मदतीने पीडित नर्सने पुढे येऊन अन्यायाला आवाज उठविण्याचे ठरविले. त्यानंतर पीडित नर्सने पोलीस उपायुक्त अंबिका, आर.ए.के. मार्ग पोलीस ठाण्यात आणि राज्य महिला आयोगाकडे तक्रार अर्ज दाखल केला.     शिवडीच्या टीबी रुग्णालयात सध्या प्रमुख वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. अमर पवार याच्याविरोधात पीडित नर्सने लेखी तक्रार दाखल केली आहे. ही लेखी तक्रार पीडित महिलेने आर. ए. के. मार्ग पोलीस ठाण्यात आणि राज्य महिला आयोगाकडे दिली आहे. या पीडित महिलेने MeTooमुळे मला पुढे येऊन तक्रार करण्याचे धारिष्ट आले असल्याचे लोकमतशी बोलताना सांगितले.लेखी तक्रारीत पीडित महिलेने सांगितले की, ''२ ऑगस्ट रोजी एका बालरुग्णाच्या वाढदिवसादिवशी रात्री १०. ३० वाजताच्या सुमारास वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी हात पुढे केला असता डॉ. अमर पवार याने माझा हात पकडला. त्यानंतर मी या डॉक्टरला कडक शब्दांत बजावले.'' हा प्रकार घडला तेव्हा पीडित नर्स रात्रपाळीला होती. त्यानंतर देखील परिस्थिती बदलली नव्हती. पुन्हा डॉ. अमर पवारने पीडित नर्सच्या खांद्याला मागे ओडून वाईट स्पर्श केला, असे या नर्सने तक्रार अर्जात नमूद केले आहे. याप्रकरणी लोकमतने शिवडी टीबी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. ललित आनंदे यांना विचारले असता, डॉ. अमर पवार हे अतिशय कर्तव्यदक्ष डॉक्टर असून, रुग्णालयातील भांडणाचे पर्यावसान हे या विनयभंगाच्या पोलीस तक्रारीत होत असल्याचे म्हणाले. तसेच पोलिसात ही तक्रार गेलीच आहे तर पोलीस याबाबत चौकशी करतील आणि योग्य ती कारवाई करतील असे आनंदे पुढे म्हणाले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHealthआरोग्यMetoo Campaignमीटूdoctorडॉक्टर