शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटातील शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थीनीचा विनयभंग, वैद्यकीय अधिकाऱ्याचे गैरकृत्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2023 15:23 IST

वैदयकीय अधिकाऱ्यांसह शाळेतील मुख्याध्यापक, महिला शिक्षिका व शिक्षकांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

- पंकज लायदे

धारणी : मेळघाटातील प्रकल्प कार्यालय अंतर्गत येणाऱ्या एका शासकीय आश्रम शाळेत शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन आदिवासी विद्यार्थीनीचा वैद्यकीय तपासणी दरम्यान तेथील कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्याने विनयभंग केला. यासंदर्भात माहिती विद्यार्थीनीने शाळेतील मुख्याध्यापकासह शिक्षकांना दिल्यानंतरही त्यांनी विद्यार्थिनीलाच चुप्पी साधायला लावून गुन्हा लपविला. त्यासह त्या वैदयकीय अधिकाऱ्याला सहकार्य केले. याबाबत तिने धारणी पोलिसात तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून त्या वैदयकीय अधिकाऱ्यांसह शाळेतील मुख्याध्यापक, महिला शिक्षिका व शिक्षकांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. धारणी प्रकल्प कार्यालया अंतर्गत येणाऱ्या एका शासकीय आश्रम शाळेत तालुक्यातील एका गावातील आदिवासी विद्यार्थीनी ही शिकत होती आणि आश्रम शाळेतीलच निवासी वसतिगृहात राहत होती. दिनांक 13 सप्टेंबर बुधवारला सकाळी 11 वाजताच्या दरम्यान तिची तब्येत खराब झाली असता आश्रम शाळेतील शिक्षक जवरे व शिक्षका मंगला हे  दोघे तिला प्राथमिक आरोग्य केंद्र साद्राबाडी येथे उपचारकरींता घेऊन गेले असता शिक्षिका मंगला या बाहेरच होत्या आणि शिक्षक जवरे हे बाजूच्या रूममध्ये होते. तेव्हा तेथील कार्यरत वैदयकीय अधिकारी अजय मालवीय आणि विद्यार्थीनी हे दोघे चेकअप रुममध्ये  एकटेच होते. तेव्हा अजय मालवीय यांनी तिचा विनयभंग केला.

दरम्यान, यावेळी घडलेला प्रकार तिने आपल्या कुटुंबीयांना सांगितला. यानंतर तिच्यासह कुटुंबीयांनी धारणी पोलिस स्टेशनला येऊन गुरुवारला रात्री उशिरा तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून धारणी पोलिसांनी वैद्यकीय अधिकारी अजय मालवीय, मुख्याध्यापक अतुल, शिक्षिका मंगला शिक्षक रावसाहेब या चौघांविरुद्ध कलम 354,354,अ 354 ब भादवी सहकलम 8,12,21 पोक्सो सहकलम 3(1)(w)(2),3(2)(va) अं.जा.व जमा.अत्याचार कायद्या अनवये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास मोर्शी येथील उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश पांडे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे 

सदरची घटना मला माहिती पडली असून त्यातील दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे तर कार्यलयातील अधिकारी कर्मचारी यांची समिती गठीत करून शाळेतील विद्यार्थीनीची चौकशी करून त्या मुख्याध्यापकासह महिला शिक्षक व शिक्षकावर कारवाई करण्यात येईल. - रिचर्ड यांथन (आयएएस)प्रकल्प अधिकारी धारणी

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी