शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भारताला मोठा धक्का, डॉमिनिकामधील कोर्टाने मेहूल चोक्शीला दिला जामीन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 21:34 IST

Mehul Choksi: पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी मेहूल चोक्शीच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्नशील असलेल्या भारताला डॉमिनिकामधील हायकोर्टाने मोठा धक्का दिला आहे.

रोस्से (डॉमिनिका) - पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी मेहूल चोक्शीच्या (Mehul Choksi ) प्रत्यार्पणासाठी प्रयत्नशील असलेल्या भारताला डॉमिनिकामधील हायकोर्टाने मोठा धक्का दिला आहे. भारतातून पळून गेलेला आणि सध्या डॉमिनिकामध्ये अटकेता असलेला व्यावसायिक मेहूल चोक्शी याला डॉमिनिकामधील न्यायालयाने जामीन दिला आहे. वैद्यकीय कारणास्तव उपचार करण्यासाठी अँटिग्वा येथे जाण्याची परवानगी मेहूल चोक्शी याला देण्यात आली आहे. कोर्टाने याबाबत एक संयुक्त सहमती आदेश दिला आहे. (Dominica Court grants interim bail to fugitive diamantaire Mehul Choksi on medical grounds to travel to Antigua & Barbuda)

कोर्टामध्ये झालेल्या सुनावणीदरम्यान मेहूल चोक्शी झूमच्या माध्यमातून रुग्णालयाच्या बेडवरून उपस्थित झाला. चोक्शीच्या कायदेशीर पथकाचे नेतृत्व त्रिनिदादचे वरिष्ठ वकील डग्लस मेंडेस करत आहेत. अन्य वकिलांनी जेना मूर डायर, जुलियन प्रीवोस्ट, जीना डायर मुनरो, वेन नोर्डे आणि कारा शिलिंगफोर्ड मार्श यांचा समावेश आहे.

मेहुल चोक्शीला दिलासा देताना कोर्टाने सांगितले की, त्याला डॉमिनिकामध्ये अवैध प्रवेश करण्याच्या प्रकरणात सुनावणीसाठी परत यावे लागेल. वैद्यकीय चौकशीसाठी चोक्शीला कोर्टाने अँटिग्वामध्ये जाण्यासाठी परवानगी दिली आहे.

जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यामध्ये मेहूल चौक्शीच्या प्रकरणात डॉमिनिकाच्या कोर्टामध्ये सुनावणी झाली होती. त्यावेळीसुद्धा आरोग्याचे कारण देऊन चोक्शीन कोर्टात उपस्थित राहिला नव्हता. मागच्या सुनावणीवेळीसुद्धा तो रुग्णालयातूनच हजर झाला होता.

चोक्शीवर पीएलबीला १३ हजार ५०० कोटी रुपयांचा गंडा घालून फरार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात अटक होण्याची शक्यता विचारात घेऊन अँटिग्वामध्ये फरार झाला होता. मात्र मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्या तो डॉमिनिका येथे पोहोचला होता. तिथे पोलिसांनी त्याला अटक केली होती.  

टॅग्स :Punjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळाCourtन्यायालय